बस,ट्रक, जीप,कार चा अपघात
केज /
शहरातील बसस्थानकासमोर आज सकाळी चार वाहनांचा भीषण साखळी अपघात झाला. या अपघातामध्ये एसटी बस, ट्रक, जीप आणि स्विफ्ट कारचा समावेश असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, एसटी बस बसस्थानकाच्या बाहेर येत असताना समोरून भरधाव वेगात ट्रक आला. ट्रकने समोरील जीपला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर ट्रक अचानक थांबला असतानाच त्याच्या मागून येणाऱ्या स्विफ्ट कारने थेट ट्रकला धडक दिली. अचानक झालेल्या या धडकांमुळे जीप आणि कारचे मोठे नुकसान झाले असून बसलाही धक्का बसला आहे.
अपघातानंतर बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. कार आणि जीपमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांच्यावर केज उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. गर्दी आणि वाहतूक नियोजनाचा अभाव हे अपघाताचे संभाव्य कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.