Malegaon Bomb Blast : माझ्याच देशाने मला आतंकवादी ठरवलं’ — निर्दोष सुटकेनंतर साध्वी प्रज्ञा भावूक

Spread the love

Sadhvi Pragya Thakur On Malegaon Bomb Blast Case :  2008 मध्ये Malegaon Bomb Blast प्रकरणात तब्बल १७ वर्षांनंतर आज विशेष एनआयए न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. स्फोट घडवल्याचे कोणतेही ठोस पुरावे नसल्याचं निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

या निर्णयानंतर भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना अश्रू अनावर झाले. कोर्टाच्या बाहेर त्यांनी भावनिक प्रतिक्रिया देताना म्हटलं की,

“माझ्याच देशाने मला आतंकवादी ठरवलं. 13 दिवस छळ झाला, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. 17 वर्षं अपमान सहन केला. पण न्यायव्यवस्थेवर विश्वास होता, म्हणून मी टिकून राहिले.”


कोर्टाचा निकाल काय म्हणतो?

विशेष एनआयए न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केलं की,

“फिर्यादी पक्ष स्फोटाच्या घटनेबाबत कोणताही ठोस पुरावा सादर करू शकला नाही. केवळ संशयाच्या आधारे कुणालाही दोषी ठरवता येणार नाही, म्हणून सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात येत आहे.”

निर्दोष मुक्त झालेले सात आरोपी

  1. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित
  2. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर
  3. मेजर (नि.) रमेश उपाध्याय
  4. समीर कुलकर्णी
  5. अजय राहिरकर
  6. सुधाकर द्विवेदी
  7. सुधाकर चतुर्वेदी

2008 साली काय घडलं होतं?

29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथे स्फोटकांनी भरलेल्या मोटारसायकलचा स्फोट झाला. या घटनेत 6 नागरिकांचा मृत्यू झाला आणि 101 जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र ATS आणि नंतर NIA ने केली. मात्र, 17 वर्षांनंतरही कोर्टात आरोप सिद्ध करता आले नाहीत.

साध्वी प्रज्ञा यांची भावनिक प्रतिक्रिया

साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी न्यायालयाच्या बाहेर प्रतिक्रिया देताना अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हटलं:

“मी संन्यासी आहे म्हणूनच आज जिवंत आहे. माझ्यावर इतका अन्याय झाला, पण मी न्यायालयाचा सन्मान करत आली. भगव्या झेंड्याला आतंकवादी ठरवलं गेलं. पण आज न्यायालयाने स्पष्ट केलं


भाजपची प्रतिक्रिया: काँग्रेसच्या विकृत राजकारणावर चपराक

या निकालावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्याय म्हणाले:

“हा निकाल काँग्रेसच्या हिंदूंना आतंकवादी ठरवण्याच्या विकृत राजकारणावर जोरदार चपराक आहे. तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शरद पवार आणि पी. चिदंबरम यांनी ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्दप्रयोग करून हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता.”


राजकीय, सामाजिक आणि कायदेशीर अर्थ

या प्रकरणाने गेल्या १७ वर्षांत अनेक राजकीय वाद निर्माण केले. तपास यंत्रणांवर, विशेषतः ATS आणि NIA वर पक्षपाती कारवाईचे आरोप झाले. काही आरोपींनी अभिनव भारत या संघटनेच्या नावाने स्फोट घडवण्याचा कट रचल्याचा आरोप नाकारला. तर पुरोहित यांनी आपली भूमिका लष्करी गुप्तचराच्या नात्याने केली असल्याचं म्हटलं होतं.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *