
राज्यातील लाखो महिलांसाठी आज हिवाळी अधिवेशनातून मोठी बातमी समोर आली आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याबाबत अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात महत्वाची घोषणा केली.
6,103 कोटींची पुरवणी मागणी
राज्यात या योजनेचे लाभार्थी दोन कोटींपेक्षा अधिक आहेत. या लाभार्थींना नियमानुसार दरमहा मिळणारा 1,500 रुपयांचा हप्ता वेळेत पोहोचण्यासाठी पवार यांनी 6,103.20 कोटी रुपयांची पुरवणी मागणी ठेवली आहे.
या निधीच्या मंजुरीनंतर पुढील काही दिवसांत थकबाकी असलेले हप्ते खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
नोव्हेंबरचा हप्ता कधी?
राज्यातील महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. यामुळे सर्वत्र नाराजीचे वातावरण होते. आज सभागृहात निधीच्या मागणीनंतर, प्रशासनिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नोव्हेंबरचा हप्ता लवकरच मिळण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
2,100 रुपयांचा हप्ता अजून थांबलेलाच
महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर महिलांना दरमहा 1,500 ऐवजी 2,100 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा झाली होती. मात्र सरकार स्थापन होऊन एक वर्ष उलटलं, तरीही 2,100 रुपयाचा एकही हप्ता खात्यात आलेला नाही.
-
Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
Spread the love Verification: 1fe30fb203b45d5d भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक. विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, वैद्यकशास्त्र अशा अनेक क्षेत्रांत भारतीय तरुणांनी जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. परंतु या यशामागे…
-
मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
Spread the love Verification: 1fe30fb203b45d5d मुंबई : राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोडी समोर येत आहेत. १९९० ते ३० जून २०२५ या कालावधीत बँकांकडे थकीत असलेल्या पीककर्जाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्जमाफीबाबत…
या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अजित पवारांनी टप्प्याटप्प्याने निधीची तरतूद करण्याची तयारी दाखवली असली तरी 2,100 रुपयांचा हप्ता प्रत्यक्षात कधी मिळणार, याचं उत्तर अद्यापही प्रलंबितच आहे.
लाडक्या बहिणींना अपेक्षा – निधी मंजूर व्हावा आणि हप्ता वेळेत मिळावा
राज्यातील लाखो महिला दरमहा मिळणाऱ्या या मदतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे आज करण्यात आलेली पुरवणी मागणी हा एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे.
आता फक्त मंजुरी आणि वितरण प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पाहत, लाडक्या बहिणींचे डोळे त्यांच्या खात्यातील मेसेजकडे खिळले आहेत.


