गडचिरोली जिल्ह्यातील राजकीयhttps://deshkarya.com/?p=1844 क्षेत्राला रविवारी उशिरा रात्री मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) च्या महिला प्रदेश उपाध्यक्षा गीताताई हिंगे यांचा पाचगाव परिसरात झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

धडक इतकी भीषण…
गीताताई हिंगे नागपूरहून गडचिरोलीकडे परतत असताना त्यांची कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाला धडकली. जोरदार धडकेमुळे कारचा चक्काचूर झाला. गीताताईंचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पतींना किरकोळ दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले, पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
राजकीय कारकिर्द खणखणीत
गीताताई हिंगे या मूळच्या भाजपच्या कार्यकर्त्या. त्यांनी जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा महामंत्री म्हणून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी नगराध्यक्ष पदाचे तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला. 26 नोव्हेंबरला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला आणि लगेचच त्यांना महिला प्रदेश उपाध्यक्षा पदाची जबाबदारी मिळाली.
सामाजिक कार्यातही पुढाकार
राजकीय कामासोबत सामाजिक क्षेत्रातही त्या तितक्याच सक्रिय होत्या. आधार विश्व फाउंडेशनच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी अनेक गरजू कुटुंबांना मदत केली. करोना काळात अन्न, औषधे, आवश्यक साहित्य पुरवून त्यांनी मोठा दिलासा दिला होता. त्यांच्या भूमिकेची जिल्ह्यात सर्वत्र प्रशंसा झाली.
जिल्हा शोकाकुल
एक जिद्दी, संवेदनशील आणि सतत लोकांमध्ये राहणारे नेतृत्व अशा स्वरूपात गीताताई हिंगे यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या अचानक जाण्यानं राजकीय व सामाजिक वर्तुळात दुःख व्यक्त होत आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली.