
नाशिक : सप्तशृंग गडावर जाणाऱ्या घाटमाथ्यावर रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एक इनोव्हा कार तब्बल हजार फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत पिंपळगाव बसवंत येथील सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
घडलेली ही दुर्घटना रतनगड आणि गणपती पॉइंट दरम्यानच्या वळणावर झाली. कारवरील ताबा सुटल्यानंतर इनोव्हा वाहनाने घाटातील कठडे तोडत दरीचा मार्ग धरला. गडातल्या उंचसखल भौगोलिक रचनेमुळे वाहन थेट एक हजार फूट खाली कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
एकाच कुटुंबावर काळाचं सावट
अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये कीर्ती पटेल यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. पिंपळगाव येथील व्यावसायिक कीर्ती पटेल यांच्या कुटुंबात एका महिन्याच्या कालावधीत दोन विवाह झाले होते. विवाहानंतर कुटुंब देवदर्शनासाठी सप्तशृंग गडावर गेले होते. देवीचे दर्शन घेतल्यानंतर परतीच्या प्रवासात ही दुर्घटना घडली.
अपघातग्रस्तांची नावे पुढीलप्रमाणे :
कीर्ती पटेल (५०, चालक)
रसिला पटेल (५०)
विठ्ठल पटेल (६५)
लता पटेल (६०)
पचन पटेल (६०)
मणिबेन पटेल (६०)
युद्धपातळीवर बचावकार्य
अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ, नांदुरी पोलिस, आपत्कालीन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरीत कोसळलेल्या वाहनातील मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. कठीण दरी, अंधार आणि हवामानामुळे काम अधिक कठीण झालं.
जिल्हाधिकारी प्रसाद, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सहायक जिल्हाधिकारी नरेश अकुनुरी, तहसीलदार रोहिदास वारुळे हे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीद्वारे कुटुंबियांना आवश्यक मदत केली जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी दिली आहे.
या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सप्तशृंग गडावर पर्यटकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.