Ration Card : दीड वर्षांनंतर रेशनवर साखर; अंत्योदय कार्डधारकांना दिलासा

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

राज्यातील अंत्योदय रेशन कार्डधारकांसाठी अखेर दिलासादायक घडामोड. तब्बल दीड वर्ष थांबलेल्या साखर वितरणाला पुन्हा सुरुवात होत असून, आता प्रतिकार्डाला एक किलो साखर रेशन दुकानातून देण्यात येणार आहे.

Amazon

Amazon App Player

Download Now

पाच हजार क्विंटल साखरेचा साठा उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली आहे. नो9व्हेंबर, डिसेंबर 2025 आणि जानेवारी या या तीन महिन्यांसाठी पुरेसा साठा मंजूर झाला असून, वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

टेंडरअभावी वितरण बंद

साखरेच्या टेंडर प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे दीड वर्षापासून रेशनवर साखर मिळणे बंद झाले होते. याचा थेट परिणाम ८७ हजार ०६४ अंत्योदय कार्डधारकांवर झाला. अनेकांनी वारंवार चौकशी करूनही त्यांना साखर मिळत नव्हती.

पुरवठा विभागाने सतत शासनाकडे मागणी केली होती. अखेर साखर मंजूर झाल्यानंतर गोदामात साठा पोहोचला असून, आगामी काही दिवसांत सर्व दुकानांत उपलब्धता सुनिश्चित केली जात आहे.

बाजारभावापेक्षा स्वस्त

सध्या बाजारात साखरेचा दर सुमारे ४४ रुपये किलो आहे. मात्र रेशन दुकानातून हीच साखर फक्त २० रुपये किलो दराने दिली जाणार आहे. यामुळे सणासुदीचे दिवस आणि रोजच्या खर्चात कार्डधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

घरांमध्ये पुन्हा गोडवा

साखर प्रामुख्याने सण-उत्सवात वापरली जाते. दीड वर्षांच्या खंडानंतर साखर पुन्हा मिळू लागल्याने अनेक कुटुंबांत नववर्षाआधीच गोडवा परतला आहे.

पुरवठा विभागाच्या माहितीनुसार, एक महिन्याचे नियतन वितरित झाले असून, पुढील महिन्यांचाही साठा टप्प्याटप्प्याने येणार आहे. रेशन दुकानांत साखरेचे वाटप सुरु झाले असून, कार्डधारकांना लवकरच प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे.

दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या या वितरणामुळे अंत्योदय कार्डधारकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे आणि घरगुती बचतीला थोडा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now