
कोल्हापूर जिल्ह्यातील हसूर (ता. करवीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी सकाळी रोजच्यासारखी कामाची वेळ सुरू झाली. घड्याळात साडेआठ वाजून गेले होते. परंतु आरोग्य केंद्र अजूनही शांतच… रुग्ण बाकांवर थंडीत थरथरत वाट पाहत होते. परंतु डॉक्टर आणि कर्मचारी मात्र कधी दिसत नव्हते. या गोंधळात अचानक एक रुग्ण येतो – तब्येत बरी नाही म्हणत केस पेपर काढतो, बाकावर बसून इतर रुग्णांशी गप्पा मारतो. काही वेळानेच खळबळ उडते. तो रुग्ण साधासुधा नव्हे तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.!
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
आरोग्यसेवेतील शिस्तीबाबत वारंवार सूचना देऊनही बदल होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. अनेकवेळा कर्मचारी व डॉक्टर वेळेत येत नाहीत, रुग्ण ताटकळत बसतात, अशी माहिती मिळाल्यानंतर कार्तिकेयन यांनी थेट स्टिंग ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. अंगात टी-शर्ट, तोंडावर मास्क, कोणताही कर्मचारी ओळखू नये असा आडोसा करून ते रुग्ण म्हणून आरोग्य केंद्रात गेले. त्यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्धhttps://deshkarya.com/?p=1755 पिंपळेही उपस्थित होते.
रुग्णांशी संवाद साधताना त्यांना धक्कादायक चित्र दिसले. एक-दोन कर्मचारी सोडले तर बाकी सर्व जण उशिरा येत होते. “डॉक्टर कधी येतात?” असा प्रश्न विचारल्यावर रुग्णांचा संताप ओसंडून वाहत होता. “तासंतास बसावे लागते, थंडीत कुडकुडतो,” अशी तक्रार काही वृद्धांनी केली. कामाची वेळ ८.३० असतानाही ९ वाजूनही वैद्यकीय अधिकारी दिसत नव्हते.
सीईओ थांबून थेट तपासणीला लागले. औषधांचा साठा, रजिस्टर, उपस्थिती नोंद, स्वच्छता आणि बायोमेट्रिक मशीन – सर्वांची पाहणी केली. उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे, त्यांची वेळ, आणि स्पष्टीकरण नोंदवले. त्यानंतर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले.
कार्तिकेयन म्हणाले, “लोकांची सेवा ही प्राथमिकता आहे. डॉक्टर आणि कर्मचारी वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. ८.३० म्हणजे ८.३०च. रुग्णांना ताटकळत बसवणे हा सर्वात मोठा अन्याय आहे. उपस्थिती शिस्तीची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल.”
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अशाच प्रकारच्या अचानक भेटी घेतल्या जाणार आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली. “एकही तक्रार येऊ नये; लोकांनी समाधानाने परत जावे,” असा स्पष्ट संदेश कार्तिकेयन यांनी अधिकाऱ्यांना दिला.
या स्टिंग ऑपरेशनमुळे आरोग्य यंत्रणेत हलचल माजली आहे. रुग्ण मात्र सुखावले — “असाच अधिकार असावा तर!” अशीच त्यांची एकमुखी प्रतिक्रिया.