
नवी दिल्ली : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारतभेटीसाठी नवी दिल्ली येथे दाखल झाले. विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत करताना राजनैतिक सौजन्य मोडत पुतिन यांना मिठी मारली. त्यानंतर दोघेही एकाच कारमधून पंतप्रधानांच्या निवासस्थानी रवाना झाले. येथे पुतिन यांच्या सन्मानार्थ खास भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
अमेरिकेकडून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा दौरा
टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत-अमेरिका संबंधांमध्ये निर्माण झालेला तणाव आणि रशियन तेल आयातीवरील निर्बंधामुळे भारत अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत पुतिन यांचा हा २७ तासांचा दौरा केवळ औपचारिक नसून आंतरराष्ट्रीय राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांची ही भेट २३ व्या भारत-रशिया शिखर परिषदेचा भाग आहे.

दौऱ्यात व्यापार, संरक्षण, ऊर्जा क्षेत्रातील करारांची सांगड घातली जाणार असून दोन्ही देशांतील आठ दशकांची मैत्री मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे.
स्वस्त तेल विक्रीचा प्रस्ताव केंद्रस्थानी
भारताला स्वस्त दरात तेल विकण्याचा प्रस्ताव रशियाने पुढे केला आहे. ऊर्जा सुरक्षेसाठी हा मुद्दा दोन्ही देशांमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
आजचा कार्यक्रम
शुक्रवारी सकाळी पुतिन राजघाट येथे महात्मा गांधींना अभिवादन करणार आहेत. त्यानंतर राष्ट्रपती भवनात त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात येईल. हैदराबाद हाऊस येथे मोदी-पुतिन बैठक आणि स्नेहभोजन होणार असून विविध विषयांवर चर्चा होईल. त्याच दिवशी रशियाच्या प्रसारण खात्याचे नवे ‘इंडिया चॅनेल’ सुरू केले जाणार आहे. सायंकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेल्या राजभोजनास पुतिन उपस्थित राहतील. रात्री सुमारास ते परत रशियाकडे प्रयाण करतील.
चर्चेचे प्रमुख मुद्दे
संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करणे
भारत-रशिया व्यापार बाह्य दबावापासून सुरक्षित ठेवणे
लघु मॉड्युलर रिॲक्टर क्षेत्रात सहकार्य
महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या
संभाव्य करार
रशियात भारतीय नागरिकांसाठी प्रवास सवलती
औषधे, कृषी, अन्नपदार्थ, खते, ग्राहकोपयोगी वस्तूंचा व्यापार
युरेशियन इकॉनॉमिक युनियनबरोबर मुक्त व्यापार करार
एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली आणि इतर लष्करी हार्डवेअर
एसयू-५७ लढाऊ जेट्सच्या खरेदीबाबत चर्चा
‘फ्लाइंग न्यूटन’मधून आगमन
पुतिन ज्या विशेष विमानातून आले ते ‘फ्लाइंग न्यूटन’ म्हणून ओळखले जाते. त्यात अत्याधुनिक दळणवळण प्रणाली, क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा, बैठकगृह, जिम, वैद्यकीय कक्ष सोबतच न्यूक्लियर कमांड बटन आहे. हे विमान ११ हजार किमी अंतर न थांबता पार करू शकते आणि हवेत असताना दोन फायटर जेट त्याचे संरक्षण करतात.
पुतिन यांच्या या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. बदलत्या भू-राजकीय परिस्थितीत भारत-रशिया संबंध आणखी दृढ करण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.