
मुंबई │ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सचिवपदी कोणाची नियुक्ती होणार, या प्रश्नावर आता राज्यातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. दोन महिन्यांपासून सचिवपद रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त होत असतानाच, “सचिव म्हणून तुकाराम मुंढे यांचीच नियुक्ती करावी”, अशी मागणी जोर धरताना दिसत आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
दोन महिने पद रिक्त, जबाबदारी कोणी घेत नाही
एमपीएससी ही घटनात्मक संस्था असून आयोगाच्या परीक्षा, निकाल, न्यायालयीन प्रकरणे, शिफारसी आणि नवीन नियम लागू करणे यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सचिवांकडे असतात. सचिव हे कार्यालयीन प्रमुखही असतात. मात्र, राज्यातील अधिकारी ही जबाबदारी स्वीकारायला उत्सुक नसल्याने हे पद रिक्तच राहिले आहे.
काही दिवसांपूर्वी अवर जिल्हाधिकारी जगन्नाथ वीरकर यांची प्रतिनियुक्ती झाली होती, परंतु त्यांनी पदभार स्वीकारण्यास नकार दिला. डॉ. सुवर्णा खरात यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सचिवपद रिक्त आहे. यामुळे आयोगाचा संपूर्ण कारभार अक्षरशः “वाऱ्यावर” असल्याची चर्चा सुरू आहे.
विद्यार्थ्यांची मागणी — “मुंढेच हवेत!”
या परिस्थितीत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे की, एमपीएससीला कडक शिस्त आणि तात्काळ निर्णयक्षमतेची गरज आहे. परिणामी तुकाराम मुंढे यांचे नाव सर्वाधिक पुढे येत आहे. सोशल मीडियावर मागणी वाढताना दिसत असून, “मुंढे सचिव झाले तर आयोगाचा कारभार सुधारेल”, असे मत व्यक्त केले जात आहे.
मुंढे हे राज्यभर ओळखले जाणारे अधिकारी. शिस्तप्रिय कामकाज, स्थानिक प्रशासनासोबत होणारे वाद, आणि वारंवार होणाऱ्या बदल्या — यामुळे त्यांचे नाव नेहमीच चर्चेत राहिले आहे.
“लवकरच नियुक्ती होईल” – शासन
आयोगामध्ये पुढील काही महिन्यांत महत्त्वाचे बदल होणार आहेत. नियमावलीपासून ते परीक्षांपर्यंत अनेक बाबींसाठी सक्षम अधिकाऱ्याची आवश्यकता आहे. याबाबत बोलताना अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांनी सांगितले की,
“लवकरच नवीन सचिवांची नियुक्ती होईल.”
तथापि, अधिकृतपणे अजून कोणाचे नाव निश्चित झालेले नाही. पण विद्यार्थ्यांमध्ये एकच चर्चा सुरु —
“एमपीएससी सचिवपदी तुकाराम मुंढे येणार का?”
नियुक्तीची अधिकृत घोषणा झाल्यावरच यावर शिक्कामोर्तब होणार आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांचे लक्ष सचिवपदाकडेच लागून राहणार हे निश्चित.