
आषाढी पौर्णिमा ते आश्वीन षौर्णीमा या तिन महिन्याचा वर्षावास
भंते धम्मप्रिय थेरो चैत्यभूमी दादर मुंबई यांच्या वर्षावासातील धम्मदेशनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे माजलगाव तालुका अध्यक्ष डॉ. भागवत साळवे यांनी केले आहे
माजलगाव /
भारतीय बौद्ध महासभा माजलगाव च्या वतीन पुज्य भन्ते धम्मप्रिय थेरो चैत्यभूमी दादर मुंबई यांचा वर्षावास प्रारंभ व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा बीड पुर्व अंतर्गत तालुका शाखा माजलगावच्या वतीन गुरुपौर्णिमा अर्थातचआषाढी पौर्णिमा ते आश्वीन षौर्णीमा या तिन महिन्याचा वर्षावास माजलगाव येथील सांची बुद्ध विहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन केसापुरी कॅम्प येथे सुरू झाला असून या वर्षावास कार्यक्रमास श्रद्धावान धम्म उपासक उपासिकांनी उपस्थित राहून पूज्य भंते धम्मप्रिय थेरो चैत्यभूमी दादर मुंबई यांच्या वर्षावासातील धम्मदेशनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे माजलगाव तालुका अध्यक्ष डॉ. भागवत साळवे यांनी केले आहे
तसेच या बौद्ध धर्मातील पवित्र अशा वर्षाच्या कालावधी मध्ये सांची बुद्ध विहार डॉ आंबेडकर भवन येथे सकाळी 5.30वा धम्म वंदना व सुत्र पटन व दु 1.00वा भगवान बुद्ध आणी त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन व धम्मदेशना होत आहे
माजलगाव शहर व तालुक्यातील विविध ठिकाणी शहरी व ग्रामीन भागामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणी त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे ग्रंथ वाचन चालु असलेल्या ठिकाणी विविध विषयांची धम्मप्रवचन मालीका राबवण्यात येत आहे या कार्यक्रमाचा प्रारंभ दि.१० जुलै २०२५ वार गुरुवार रोजी पासून जिल्हा शाखा बीड पुर्व अंतर्गत तालुका व शहर शाखेच्या वतीन राबवण्यात येत आहे व विषय मालीका तील गुरु पौर्णीमा व वर्षावासाचे महत्व या विषयाने सुरवात झाली आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन जि.संस्कार उपाध्यक्ष बीड पुर्व चे एस बी मोरे ,महिला जि.अध्यक्षा कमलताई डोंगरे,जि.पर्यटन सचिव के व्ही साळवे आहेत तर कार्यक्रमाच्या उदघाटक म्हणुन भारतीय बौद्ध महासभेच्या महिला तालुका अध्यक्षा मंदाताई साळवे,तर अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष डॉ भागवत साळवे हे आहेत तर या कार्यक्रमासाठी भारतीय बोद्ध महासभेचे तालुका ,शहर ,व ग्रामीण पदाधिकारी तसेच धम्म उपासक उपासिकांनी उपस्तीत राहुल या पवित्र अशा वर्षावासाचा व पूज्य भंते धम्मप्रिय,चैत्यभूमी दादर मुंबई यांच्या प्रवचनाचा लाभ घ्यावाआसे अवाहन तालुका अध्यक्ष डॉ भागवत साळवे व शहर अध्यक्ष प्रा एल आर मस्के यांनी केले