
माजलगाव / प्रतिनिधी
माजलगाव शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गहाळ झालेल्या १७ मोबाईल फोनचा शोध घेऊन, संबंधित मूळ मालकांना परत देण्यात आले. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत आभार मानले.
डीजीटल युगामध्ये मोबाईल हा प्रत्येक व्यक्तीसाठी केवळ संपर्काचे साधन नसून, वैयक्तिक आठवणी व महत्वाची माहिती जपवणारे साधन आहे. त्यामुळे मोबाईल हरवल्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

शहरातील विविध भागांतील नागरिकांनी हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर पोलीस स्टेशन पातळीवर विशेष पथकाची नियुक्ती करून एकूण १७ हरवलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले.
सदर मोबाईल फोन माजलगाव पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनित कॉवत यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले. यावेळी मोबाईलधारकांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले.
ही कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनित कॉवत, मा. अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम, तसेच उपविभागीय अधिकारी निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद मुंढे, पो.ह. रामेश्वर खेत्रे (1796), पो.का. संतराम थापडे (2299) व पो.का. महादेव बहिरवाळ (2172) यांनी मोलाची भूमिका बजावली.