
टीईटीविरोधातील मोर्चा आणि शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शिक्षकांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक तसेच अनुदानित-विनाअनुदानित शिक्षक संघटनांनी मोर्चाची हाक दिली असली, तरी शाळा बंद ठेवण्याबाबत एकमत दिसत नाही.
दरम्यान, माध्यमिक शिक्षक संचालकांनी मोर्चाच्या दिवशी शाळा बंद ठेवल्यास त्या दिवसाचे वेतन कापण्याचा आदेश जारी केला. त्यामुळे मोर्चात सहभागी होणं किती शिक्षकांना परवडेल, हा प्रश्न मोठा ठरला आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
समन्वय समितीने मोर्चा व शाळा बंदची घोषणा केली असली, तरी काही संघटना शाळा बंद करण्याला ठाम विरोध करीत आहेत.
काही संघटनांचा युक्तिवाद –
“मोर्चा काढावा, पण विद्यार्थ्यांच्या शिक्षणात व्यत्यय आणू नये.”
या मतभेदामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम वाढला असून, ५ डिसेंबरच्या आंदोलनाचा प्रतिसाद काय असेल याबद्दलही अनिश्चितता आहे.
पालकांचा सवाल : विद्यार्थ्यांचे नुकसान कोण भरून काढणार?
टीईटी परीक्षा ही शिक्षकांची वैयक्तिक पात्रता प्रक्रिया आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शाळा बंद करून आंदोलन काढणे कितपत योग्य असा सवाल पालकांकडून उपस्थित होत आहे.
काही पालक म्हणतात –
“परीक्षा शिक्षकांची, नुकसान मात्र मुलांचे! अभ्यासात खंड पडला तर जबाबदारी कोणाची?”
सुटीच्या दिवशी झाला होता समर्थन
यापूर्वी ९ नोव्हेंबरला काढलेल्या मोर्चाला जिल्ह्यातील जवळपास सर्व संघटनांचा सहभाग होता. त्या दिवशी सार्वजनिक सुटी असल्याने कोणतीही अडचण निर्माण झाली नव्हती.
आता मात्र पुन्हा मोर्चा निघत असताना सुटी नसल्याने शाळा बंद ठेवण्याबाबत तणाव वाढला आहे.
मध्यवर्ती संघटनेत फूट
राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटनेत २५ संघटना सहभागी आहेत. तरी संभाजीराव थोरात गटाने आंदोलनाला विरोध केल्यामुळे बाकी संघटनांत संभ्रम दिसून येत आहे.
काही संघटनांनी खुलेआम जाहीर केले –
मोर्चाला पाठिंबा आहे, पण शाळा बंद ठेवण्याला विरोध.”
कारवाईची भीती
शाळा बंद ठेवणाऱ्या शिक्षकांवर वेतन कपात किंवा इतर कारवाईचा धाक असल्याने अनेक शिक्षक सावध भूमिकेत आहेत. त्यामुळे मोर्चा किती मोठा उभारला जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकंदरीत चित्र असं की –
मोर्चा आहे, पण शाळा बंद ठेवायची की नाही यावर मतभेद;
वेतन कपात आदेशाने दडपण वाढलं;
विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं नुकसान टाळत आंदोलन करण्याची मागणी जोर धरत आहे.