
भारतीय टपाल विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी ३५ हजारांहून अधिक जागा उपलब्ध असून, या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. विभागाकडून अधिकृत अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
पात्रता
किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी पात्र ठरणार आहेत. कोणतीही लेखी किंवा स्पर्धा परीक्षा न घेता, उमेदवारांची निवड गुणांच्या आधारे केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
- अर्ज प्रक्रिया
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार असून, अधिसूचना जाहीर झाल्यानंतर अर्ज लिंक सक्रिय केली जाणार आहे.
फॉर्ममध्ये काही बदल करण्याची आवश्यकता असल्यास, विभाग २ ते ३ दिवसांसाठी अडजस्टमेंट विंडो उपलब्ध करून देईल.
- शुल्क
भरतीसाठी सर्व श्रेणींकरिता अर्ज शुल्क ₹१००/- निश्चित करण्यात आले आहे.
पेमेंटची सुविधा नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यांच्या माध्यमातून उपलब्ध असेल.
निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार ₹२०,००० ते ₹७०,००० पर्यंत महिन्याचे वेतन मिळू शकते. पगार रक्कम पद, विभाग आणि स्थानानुसार वेगळी असेल.
- महत्त्वाची माहिती – एक नजरात
तपशील माहिती
संस्था भारतीय पोस्ट विभाग
पदाचे नाव ग्रामीण डाक सेवक
एकूण पदे ३५,०००+
अधिसूचना जानेवारी २०२६ (अपेक्षित)
अर्ज पद्धत ऑनलाइन / ऑफलाइन
पात्रता दहावी उत्तीर्ण (५०% गुण)
अधिक माहिती कुठे मिळेल?
अर्ज प्रक्रिया, तारखा व इतर सर्व अधिकृत अपडेट्ससाठी विभागाची वेबसाइट पाहावी:
indiapost.gov.in