जुलै-ऑगस्टचा एकत्रित हप्ता ३००० रुपये खात्यात जमा होणार
लाडकी बहीण योजनेतील महिलांना लवकरच जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे. या दिवशी खात्यात ३००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, काही महिलांना हा लाभ मिळणार नाही.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अनेक महिलांनी अजूनही जुलै महिन्याचा हप्ता न मिळाल्याने चिंता व्यक्त केली होती. परंतु आता महाराष्ट्र शासनाकडून संकेत मिळत आहेत की जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रितपणे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे
जुलैचा हप्ता महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. नाहीतर रक्षाबंधनच्या दिवशी (१९ ऑगस्ट २०२५) लाभार्थी महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रक्षाबंधनचं खास गिफ्ट!
या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. मात्र सणासुदीच्या पार्श्वभूमीवर काहीवेळा एकत्रित रक्कम दिली जाते. यावर्षी रक्षाबंधनच्या दिवशी महिलांना ३००० रुपयांचा हप्ता मिळू शकतो. त्यामुळे महिलांचं रक्षाबंधन अधिक खास आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त होणार आहे.
या महिलांना मिळणार नाही हप्ता
सरकारने लाडकी बहीण योजने मधील लाभार्थी महिलांची योग्य निकष जे ठरवलेले आहेत त्यामध्ये जे बसणार नाहीत अशा महिलांना रद्द करण्यात येणार आहे त्यामध्ये
ज्यांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे
ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे
सरकारी नोकरीत कार्यरत महिला
ज्यांनी चुकीची माहिती देऊन अर्ज केला
योजनेच्या तपासणी दरम्यान सुमारे १० लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले
One thought on “लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी आनंदाची बातमी!”