
स्मार्टफोन हा आता केवळ कॉल-मेसेजपुरता मर्यादित राहिलेला नाही. दैनंदिन कामकाज, ऑनलाईन मीटिंग्स, मनोरंजन, फोटोग्राफी—सगळं याच एका उपकरणावर अवलंबून आहे. त्यामुळे स्मार्टफोन निवडताना डिझाईन, टिकाऊपणा, बॅटरी लाइफ आणि कॅमेरा परफॉर्मन्स या गोष्टींमध्ये कोणतीही तडजोड लोकांना मान्य नसते.
या पार्श्वभूमीवर OPPO ने नुकतीच लाँच केलेली Find X9 Series जोरदार चर्चेत आली आहे. 18 नोव्हेंबरला सादर झालेल्या या फ्लॅगशिप सीरिजमध्ये डिझाईनपासून कॅमेरा, बॅटरी, परफॉर्मन्स आणि AI अनुभवापर्यंत जवळपास सर्वच क्षेत्रात मोठी उडी घेतल्याचे दिसते.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट

हातात बसणारा नवा डिझाईन – कॅमेरा मॉड्यूललाही नवी ओळख
Find X9 Series हातात घेताच सर्वप्रथम जाणवणारी गोष्ट म्हणजे त्याचा नवीन डिझाईन भाषा. मागील पिढीच्या तुलनेत कॅमेरा मॉड्यूल 10–15% लहान केले असून ते आता फ्रेमच्या left-top corner मध्ये रिपोझिशन करण्यात आले आहे.
मोठे सेन्सर्स असूनही फिंगर smudges चा त्रास कमी होईल, अशी डिझाईनची नैसर्गिक रचना ठेवण्यात आली आहे.
One-piece glass back आणि aerospace-grade aluminium frame यामुळे फोन हातात प्रीमियम आणि एकसंध वाटतो. OPPO ची ultra-precise cold-sculpting प्रक्रिया कॅमेरा मॉड्यूल थेट back cover मध्ये integrate करते—हे या सीरिजचे खास वैशिष्ट्य.

1.15mm चे कमी bezels मिळून मिळणारे near-borderless display हेही व्हिज्युअल अनुभवाला नवी उंची देतात.
स्लिम बॉडीत मोठ्या बॅटऱ्यांची किमया
Slim frame असूनही OPPO ने जाडजूड बॅटरीची सोय ठेवली आहे.
Find X9: 7025mAh
Find X9 Pro: 7500mAh
हे आकडे पाहिले तर Find X9 फक्त 7.99mm पातळ असतानाही, मागील मॉडेल्सपेक्षा तब्बल 24.7% अधिक बॅटरी क्षमता देतो.
यातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे OPPO चे silicon-carbon battery material, जे 12 patents ने संरक्षित आहे. यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढते आणि साधारण बॅटऱ्यांपेक्षा 400 cycles अधिक दीर्घायुष्य मिळते.
कंपनीच्या मते, सामान्य वापरात फोन दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो.
Find X9 सलग 5 तास 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची ताकद राखतो.
चार्जिंग पर्याय:
80W SUPERVOOC wired charging
50W AirVOOC wireless charging
Hasselblad-powered Camera: मोबाईल फोटोग्राफीचा नवा अध्याय
OPPO आणि Hasselblad च्या सहकार्याचा प्रभाव या सीरिजमध्ये स्पष्ट दिसतो. दोन्ही मॉडेल्समध्ये True Color Camera सहित Hasselblad-powered camera systems वापरण्यात आले आहेत, ज्यामुळे complex lighting मध्येही रंग अचूक टिपले जातात.

Find X9 Camera Setup
Triple 50MP system
3X optical zoom असलेला periscope telephoto
Laser autofocus
Find X9 Pro ची धमाल – 200MP Telephoto
Pro मॉडेलमध्ये 1/1.56-inch sensor असलेला 200MP Hasselblad telephoto camera देण्यात आला आहे.
तसेच floating element design मुळे 10cm इतक्या जवळून macro photography चीही सुविधा मिळते.
OPPO चा LUMO Image Engine 200MP resolution मध्येही clearer details, उत्तम dynamic range आणि कमी noise सुनिश्चित करतो.
48 zones असलेला multi-spectrum sensor रंग अचूकतेत मोठा फरक पाडतो. Low-light, portrait आणि HDR मोड्स अधिक सक्षम बनवले आहेत.
IP66/IP68/IP69 Ratings – अतुलनीय टिकाऊपणा
दोन्ही मॉडेल्समध्ये:
Dust-tight design
1.5m पाण्यात 30 मिनिटे submersion
High-temperature/high-pressure water jets सहन करण्याची क्षमता
Find X9 मध्ये Gorilla Glass 7i तर Pro मध्ये Gorilla Victus 2 आहे.
OPPO ची Splash Touch technology स्क्रीन ओली असली तरीही प्रतिसादपूर्ण ठेवते.
ColorOS 16: अधिक जलद, अधिक स्मार्ट
नवीन ColorOS 16 मध्ये दृश्यात्मक बदलांबरोबरच परफॉर्मन्समध्येही उल्लेखनीय सुधारणा:
Tap responsiveness 40% वाढ
Scrolling stability 52% जास्त
System stability 37% वाढ
Power usage 13% कमी
AI Portrait Glow, AI Eraser, AI Unblur, AI Writer, AI Mind Space यांसारखे स्मार्ट टूल्स दैनंदिन वापर खूपच intuitive आणि smart बनवतात.
OPPO पाच major OS upgrades आणि सहा वर्षांचे security updates देत आहे.
साउंड अनुभवासाठी Enco Buds3 Pro+
Find X9 Series सोबत OPPO ने Enco Buds3 Pro+ देखील सादर केले आहेत.
Rich bass, crisp vocals
Smart adaptive noise cancellation
43 तासांपर्यंत प्लेबॅक
किंमत: ₹2,099
लॉन्च ऑफर: ₹1,899 (21–30 नोव्हेंबर)
किंमती आणि उपलब्धता
OPPO Find X9
12GB + 256GB – ₹74,999
16GB + 512GB – ₹84,999
OPPO Find X9 Pro
16GB + 512GB – ₹1,09,999
विक्री सुरू: 21 नोव्हेंबर पासून
उपलब्ध: OPPO e-store, Amazon, Flipkart आणि प्रमुख रिटेल आउटलेट्स
Hasselblad Teleconverter Kit
किंमत: ₹29,999
फक्त OPPO e-store वर उपलब्ध
लाँच ऑफर्स
SBI, HDFC, Kotak, IDFC कार्ड्सवर 10% instant cashback
24 महिने no-cost EMI
Cashify/Servify सोबत 10% exchange bonus
Zero Down Payment schemes (24 महिने)
180-day hardware replacement
3 महिने Google Gemini Pro मोफत
Paytm Travel flight voucher ₹2000
Jio benefits ₹2250
18–25 वयोगटातील Jio users साठी 18 महिने Gemini Pro मोफत
OPPO Find X9 Series ही स्मार्टफोन मार्केटमध्ये ताज्या डिझाईन, प्रगत कॅमेरा, दमदार बॅटरी, मजबूत टिकाऊपणा आणि स्मार्ट AI अनुभव यांचे एक balanced पॅकेज आहे. हा फोन केवळ फिचर्सने समृद्ध नसून, दीर्घकालीन वापरासाठीही तितकाच विश्वासार्ह ठरेल असा दिसतो.