जळगाव : जामनेर-पहूर रस्त्यावर पिंपळगाव गोलाई परिसरात मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मालवाहू वाहनाने KTM दुचाकीला दिलेल्या जबरदस्त धडकेमुळे ही शोकांतिका घडली. या घटनेने संपूर्ण जामनेर तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
धडकेत चार तरुणांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, पहूरजवळील काही अंतरावर KTM दुचाकीवरून चार तरुण जात असताना समोरून येणाऱ्या मालवाहू वाहनाने त्यांना जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, चारही जणांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. मृतांमध्ये अतुल चंद्रकांत सुरवाडे, अंकुश समाधान लोखंडे, अजय यांचा समावेश असून, एका तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
नागरिकांचा तत्पर प्रतिसाद
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पहूरमधील नागरिकांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. मदतकार्य सुरू करत मृतदेह रस्त्याच्या कडेला हलवण्यात आले. घटनास्थळाचा पाहता अपघाताची भीषणता समोर आली.
शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविले
मृत तरुणांचे मृतदेह पुढील प्रक्रिया आणि शवविच्छेदनासाठी जामनेर सरकारी रुग्णालय, पहूर उपजिल्हा रुग्णालय आणि जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. या घटनेने तालुक्यात शोककळा पसरली आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
पोलिसांचा तपास सुरू
दरम्यान, या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मालवाहू वाहनाचा आणि चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण दुर्घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तपासले जात असून, पुढील कारवाई केली जाणार आहे.
या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने चार तरुणांचे आयुष्य अकाली हरपले असून, परिसरात शोककळा पसरली आहे.