प्रवाशाचा खिसा कापणारे गजाआड – माजलगाव पोलिसांची धडक कारवाई

Spread the love

आरोपींकडून २२,००० रुपये जप्त

माजलगाव/
माजलगाव शहरातील बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत प्रवाशाचे २२,००० रुपये लंपास करणाऱ्या टोळीतील दोन चोरट्यांना माजलगाव पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई २६ जुलै २०२५ रोजी करण्यात आली.

फिर्यादी धनंजय किसनराव ताटे (रा. परळी) हे माजलगाव येथून बीडकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातून रोकड रक्कम २२,००० रुपये चोरून नेली. याबाबत त्यांनी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीसांनी गुन्हा क्रमांक २०५/२०२५ नुसार कलम ३०३(२) भादंवि अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलीसांनी गुन्ह्याचा तपास करून बीड येथील र.बलभीम नगर पेठ बीड येथे राहणाऱ्या दत्ता ज्ञानेश्वर गुंजाळ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्याच्या साथीदारांची माहिती दिली. या टोळीतील आरोपी सचिन साठे आणि चंदू गायकवाड (दोघे रा. गांधी नगर, बीड) यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी गेलेली संपूर्ण रोकड – २२,००० रुपये जप्त केली आहे.

सदरची कारवाई नवनित कॉवत, पोलीस अधीक्षक बीड, श्रीमती चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, निरज राजगुरु उपविभागीय पोलीस अधिकारी माजलगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, ग्रेपोउपनि तुळशिराम जगताप, पोहवा/कृष्णा जायभाये, किशोर जाधव, बाळकृष्ण जायभाये. यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *