माजलगावात साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जन्मोत्सवाचे आयोजन

Spread the love

उपसरपंच अनिल राधे कांबळे

माजलगाव /  प्रतिनिधी:

लोकशाहिर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे सार्वजनिक जन्मोत्सव 2025 चे आयोजन शहरातील वैष्णवी मंगल कार्यालयात अनिल राधे कांबळे मित्र परिवाराच्या वतीने दि. 30 जुलै रोजी करण्यात आले असुन भव्य मोटारसायकल रॅली, गायनाचा कार्यक्रम असे उपक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आयोजक उपसरपंच अनिल राधे कांबळे यांनी दिली आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन मा. मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार असुन अध्यक्षस्थांनी मा. सभापती नितीन नाईकनवरे, मिलींद आवाड, मोहन जगताप, आमदार प्रकाश सोळंके, ओमप्रकाश शेटे, बाबुराव पोटभरे, सहाल चाउस यांची विशेष उपस्थिती असणार आहे. प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. सुरेश साबळे, शिवाजी रांजवण, सुशिल डक, मनोज जगताप, सचिन सानप, राजेश मेंडके, डॉ. दिनकर मस्के, नारायण भले, पद्माकर कांबळे, कचरू कांबळे, संपादक दीपक थोरात,  सभापती जयदत्त नरवडे, मा. सभापती कल्याण आबुज, मा. नगरसेवक विनायक रत्नपारखी, शरद यादव, दीपक मेंडके, इरफान खान, शिवसेनेचे तालुकाप्रमुख  तुकाराम येवले, शिवाजी सुतार, सरपंच राज अर्जुन, सरपंच अजय शिंदे,  दयानंद स्वामी, भास्कर शिंदे, मानवी हक्क अभियानचे  राजेश क्षीरसागर, मधुकर कांबळे, दत्ता कांबळे, अमोल शेरकर, एकनाथ मस्के, विठ्ठल तूपसुंदर, सदानंद प्रधान, ज्ञानेश्वर सरोदे, येसूब आतार, अनिल भिसे, डॉ. ज्ञानेश्वर गिलबिले, डॉ. यशवंत गाडगे, डॉ. अमोलर परतुरकर यांची उपस्थिती असणार आहे. दि. 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10. 30 वाजता भव्य मोटारसायकल रॅली छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकांपर्यंत काढण्यात येणार आहे तर शाहीर शितल साठे, युवराज ढगे, गायक सुमित साळवे आणि संच यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक उपसरपंच अनिल राधे कांबळे, संयोजक रोहित भिसे, जयंती उत्सव समिती अध्यक्ष विक्रांत कांबळे, उपाध्यक्ष संकेत कांबळे, सचिव श्याम कांबळे, सहसचिव मनोज गायकवाड, कोषाध्यक्ष युवराज कांबळे, सहकोषाध्यक्ष शुभम भिसे, सदस्य प्रदीप कांबळे, प्रवीण कांबळे, सदस्य सुहास शिरसागर, सदस्य मयूर कांबळे यांचेसह अनिल राधे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *