फोन येताच स्क्रीनवर दिसणार ‘Aadhaar-Verified Name’; सरकारची CNAP प्रणाली सुरु

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

अनपेक्षित आणि अनोळखी नंबरवरून येणारे कॉल आता ओळखणे सोपे होणार आहे. केंद्र सरकारने अधिकृतपणे CNAP (Calling Name Presentation) प्रणालीचा पहिला टप्पा लाईव्ह केला असून, यामध्ये कॉल आल्यावर तुमच्या स्क्रीनवर कॉलरचे Aadhaar-Verified नाव दिसणार आहे. स्कॅम कॉल्स, फसवणूक आणि बनावट ओळख वापरून होणारे गुन्हे थांबवण्यासाठी हे मोठे पाऊल मानले जात आहे.

Amazon

Amazon App Player

Download Now

मिळालेल्या माहितीनुसार, देशातील काही भागांमध्ये CNAP ची चाचणी सुरू असून, नवीन प्रणालीमुळे कॉल उचलण्यापूर्वीच कॉल करणाऱ्याची खरी ओळख समोर येणार आहे. यापूर्वी कॉलर आयडी अॅप्सवर अवलंबून राहावे लागत असताना, आता थेट आधार-प्रमाणित नाव स्क्रीनवर झळकणार आहे.

या नव्या यंत्रणेनुसार, कॉल आल्यानंतर आधी कॉलरचे Aadhaar-Verified नाव, आणि नंतर तुम्ही सेव्ह केलेले नाव (उदा. ‘पापा’, ‘आई’, ‘फ्रेंड’) दिसेल. अनोळखी नंबर असल्यास फोनवर फक्त Aadhaar-verified नावच दिसणार आहे.

सरकारचा दावा आहे की या प्रणालीमुळे स्पॅम कॉल्स मोठ्या प्रमाणात कमी होतील आणि लोकांना कॉलला उत्तर देण्यापूर्वी अधिक सुरक्षित निर्णय घेता येईल. तथापि, काही तज्ञांनी गोपनीयता भंग होण्याची शक्यता व्यक्त केली असून, नंबर सेव्ह केला आहे की नाही याची पर्वा न करता कॉलिंग स्क्रिनवर Aadhaar नाव दिसण्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.

CNAP पूर्ण देशभरात कधी लागू होईल याबाबतची अधिकृत माहिती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रणालीचा पहिला टप्पा सुरू होताच मोबाईल वापरकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now