माळेगावच्या सभेत अजित पवार आक्रमक; मतदारांना स्पष्ट शब्दांत इशारा

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

Amazon

Amazon App Player

Download Now

तुम्ही माझ्या उमेदवारांना निवडून दिले नाही आणि तुम्ही काट मारली कि मी पण काट मारणार, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पाश्वभूमीवर शुक्रवारी मतदारांना दिला. ते बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलत होते.


अजित पवार म्हणाले कि एका झटक्यात सगळी काम होत नाहीत. त्यासाठी व्हिजन लागतं. मतभेद असले तरी बाजूला ठेवावे लागतात. अर्थ मंत्रालय माझ्याकडे आहे परंतु वाटप करत असताना जसं पंगत बसल्यानंतर वाढपी ओळखीचा असल्यानंतर बरं वाटतं तसं वाढपी तुमच्या समोर उभा आहे, असं अजित पवार म्हणाले.


माळेगाव नगरपंचायतीच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणण्याची क्षमता केवळ आपल्याकडेच आहे, माळेगावकरांनो, तुमचं बजेट आहे फक्त पाच-सहा कोटी रुपयांचं. त्यात तुम्ही कितीही वर्ष घास घास घासली तरी विकास होऊ शकत नाही. बारामतीचा विकास जसा हजारो कोटी आणून झाला, तीच गोष्ट आपल्याला माळेगावला करायची आहे. माळेगाव नगरपंचायत माझ्या विचारांची नसेल तर माझे फारसे अडणार नाही, पण माझ्या विचारांचे लोक असतील तर निधी कसा वापरायचा हे मला सांगता येईल, असे त्यांनी नमूद केले


अजित पवार म्हणाले कि मागे झालं गेलं ते गंगेला मिळाले, आता नवी पहाट आहे. 2500 कोटीचे बजेट माझ्याकडे आहे. त्यातले तुम्हाला पैसे देईल. कुणीही संपत नसते, संकुचित विचार करू नका. मन थोडं मोठं ठेवा असे अजित पवार म्हणाले.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत मी उभा राहणार नव्हतो. मी आणि पवार साहेब एकत्र असताना कधी आम्ही हारायचो. माझ्या स्वप्नात देखील नव्हतं की मी चेअरमन होईल. मी उतरलो तर संपूर्ण ताकतीन. बारामतीत 9 जागा बिनविरोध निवडून गेल्या आहेत. अजून थोडा रेटा लावला असता तर दहा जागांच्या पुढे आकडा गेला असता असे अजित पवार म्हणाले.


माळेगाव नगरपंचायतसाठी अजित पवार गट आणि जनमत आघाडीकडून सुयोग शामराव सातपुते यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आलेली आहे. काहीनी बंड केलं आणि म्हणतात आम्ही दादांचे कार्यकर्ते आहोत. माझे कार्यकर्ते होतात तर बंडखोरी का केली? असा सवालही त्यांनी केला. आता आमच्या विरोधात उभे राहिले आणि निवडून आले, नंतर वरून निधी नाही मिळाला तर काय करणार? ते म्हणणार की आम्हाला निधी मिळाला नाही वरून, निधी मिळत नाही तर उभा कशाला राहिला? मी बारामतीत करतोय ते इथे पण करेल, फक्त तुम्ही साथ द्या, असे आवाहन अजित पवार यांनी केले. मी इथे झाड लावलं, आणि कुणी नेलं उपटून तर मी काय करणार? पाणी समजा कुणी घातलं नाही तर मी मुंबईतून येणार का पाणी घालायला? असा सवाल त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now