
बीड |
सरकारी व्यवस्थेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला आहे. गाय-गोठ्याची फाईल करण्यासाठी तब्बल हजार रुपये लाच मागणाऱ्या गेवराई पंचायत समितीतील एका अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. विनायक राठोड असे या आरोपी अभियंत्याचे नाव आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
शेतकऱ्यांकडून केवळ फाईल पुढे ढकलण्यासाठी पैसे उकळण्याचा हा प्रकार आहे. तक्रारदार शेतकऱ्याने लाच देण्यास नकार देत सरळ बीड एसीबीकडे धाव घेतली. प्राथमिक तपासात आरोपांची खात्री पटल्यावर एसीबीने सापळा रचला.
बुधवार, 19 नोव्हेंबर रोजी राठोड यांनी त्यांच्या बीडमधील अंबिका चौकातील प्रायव्हेट कार्यालयात एक हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र सापळ्याची चाहूल लागताच राठोड यांनी तक्रारदाराला टाळण्यास सुरुवात केली. तरीदेखील त्यांच्या लाचेच्या मागणीचे पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर एसीबीने त्यांना अटक केली.
ही कारवाई डीवायएसपी सोपान चित्तमपल्ले यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी पुढील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.