
पुणे–मुंबई एक्सप्रेसवेवर रविवारी पहाटेची वेळ… रस्ता शांत होता. वाहतूकही तुलनेने कमी. पण काही क्षणांतच भीषण अपघाताने वातावरण हादरून गेले. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर एका ट्रकचालकाचा वेगावर ताबा सुटला आणि अनियंत्रित ट्रकने मधील बॅरियर ओलांडत थेट विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये प्रवेश केला. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या कारवर तो सरळ जाऊन आदळला आणि धडकेनंतर ट्रक कारवरच उलटला. कारचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
या भयानक अपघातात कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. पहाटे साधारण चारच्या सुमारास कामशेतजवळ, पुणे लेनवरील किलोमीटर 68 परिसरात हा अपघात घडल्याची माहिती मिळते.
अपघातानंतर एक्सप्रेसवेवरील वाहतूक दीड तास पूर्णपणे ठप्प झाली होती. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर तब्बल दहा किलोमीटर लांबीची वाहनरांग तयार झाली. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हलवल्यानंतर पोलिसांनी वाहतूक पुन्हा सुरळीत केली.
महामार्ग पोलिसांनी पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात ट्रकचालकाचा ताबा सुटल्यानेच हा भीषण अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.