अध्यक्षपदी सुधाकर कांबळे तर उपाध्यक्षपदी अंशीराम कांबळे

माजलगाव / प्रतिनिधी:
शहरापासुन जवळच असलेल्या ब्रम्हगाव येथे नुकतीच गावकर्यांच्या वतीने संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्वानुमते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीची कार्यकारणी जाहिर करण्यात आली असुन,अध्यक्षपदी सुधाकर कांबळे यांची तर उपाध्यक्षपदी अंशीराम कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते तथा आंबेडकरी चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे यांनी गुलाब पुष्पहार घालून अध्यक्ष व उपाध्यक्ष सह सर्व सदस्य व कार्यकारणीचा सत्कार करून जंगी कार्यक्रम करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
यावेळी ब्रम्हगाव येथे अण्णाभाऊ साठे जयंती विवीध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात येणार असुन यामध्ये व्याख्यान, महिलांना साडी वाटप, जिल्हा परिषद शाळेला कॉम्प्युटर व प्रोजेक्टरची भेट, संविधान प्रतींचे वाटप असे विवीध उपक्रम होणार आहेत. यासाठी गावाच्या स्वखर्चाने जयंती साजरी होणार असुन इतरांना वर्गणी न मागण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अध्यक्षपदी सुधाकर कांबळे यांची तर उपाध्यक्षपदी अंशीराम कांबळे, सचिव विठ्ठल कांबळे, अशोक कांबळे, श्रीमंत कांबळे, सहसचिव अंजन कांबळे, कोषाध्यक्ष दशरथ कांबळे, सदस्य बाबासाहेब कांबळे, भानुदास कांबळे यांच्या निवडी करण्यात आल्या, तर अशोक कांबळे, मधुकर कांबळे, बंडू कांबळे, शिवाजी कांबळे, निलेश कांबळे सह गावकर्यांनी या सार्थ निवडीचे स्वागत केले.