
बीड/
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाचा धूनकवड फाटा परिसरात शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. धारूरवरून केजकडे जात असताना ताफ्यातील एका गाडीची दुचाकीला जबर धडक बसली. या अपघातात नवरा–बायको आणि दोन लहान मुलांसह चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळते. धडकेत ताफ्यातील सुरक्षा रक्षकही जखमी झाला असून त्याच्यावरही उपचार सुरू आहेत.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट

अपघात एवढा तीव्र होता की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. धडक होताच आसपासच्या नागरिकांनी पुढे येत तात्काळ मदतकार्य सुरू केले. सर्व जखमींना तातडीने धारूर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. यामुळे काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातस्थळावरील वाहतूक सुरळीत करत पंचनामा सुरू केला. अपघाताचे नेमके कारण काय? ताफ्याचा वेग, अचानक आलेली दुचाकी किंवा रस्त्यावरील गर्दी—यापैकी कोणत्या कारणामुळे धडक झाली याची चौकशी सुरू आहे. अपघातानंतर काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती; मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.