
परभणी /
जल्लोष लोककलेचा, इतिहास महाराष्ट्राचा यासह कला, संस्कार वगैरे शिबीरातून अशा अन्य उपक्रमांमधूनच बालरंगभूमी बालमनाची जडण-घडण करीत आहे, असे मत बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा निलम शिर्के सावंत यांनी व्यक्त केली.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
बालरंगभूमी परिषद मुंबई यांच्या संकल्पनेतून बालरंगभूमी परिषद शाखा परभणी यांच्या वतीने येथील कौस्तूभ मंगल कार्यालयात आयोजित ‘जल्लोष लोककलेचा’ या स्पर्धात्मक महोत्सवाचे उद्घाटन आज शनिवारी सौ. शिर्के यांच्याहस्ते मोठ्या थाटामाटात झाले. यावेळी कवी इंद्रजीत भालेराव हे अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बालरंगभूमी परभणीचे मार्गदर्शक विजय करभाजन, प्रा रवीशंकर झिंगरे, किशोर पुराणिक, गिरीश कर्हाडे, परभणी बाल रंगभूमी अध्यक्ष आबा ढोले, उपाध्यक्ष प्रा. नितीन लोहट, परीक्षक डॉ. सुनील तूरुकमाने, अतुल देशपांडे, वर्षा जोशी, श्रीकांत देशपांडे, प्रकाश पंडित आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी सौ. शिर्के यांनी, जल्लोष लोककलेचा, इतिहास महाराष्ट्राचा, कला संस्कार शिबिर अशा उपक्रमांमधून बालरंगभूमी बालमानाची जडणघडण करत आहे व एक सुसंस्कारित बालक निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. अशा उपक्रमांची आज अत्यंत आवश्यकता आहे. आणि याचसाठी बालरंगभूमी ही केवळ बालकांसाठी सतत कार्यरत राहील, अशी ही ग्वाही बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष शिर्के सामंत यांनी दिली. परभणी हे माझे आवडते शहर असून
परभणी शहरात मोठ्या कलावंतांची आणि बालकलावंतांची मोठी फौज आहे त्या कलाकारांच्या गावाला येण्यास आपणास निश्चितच आवडेल. यापुढेही बालरंगभूमी परिषदेच्या वतीने उपक्रम राबविले जाणार असून त्या उपक्रमास आपण उपस्थित राहू, असे आश्वासन दिले. तर कवी भालेराव यांनी अध्यक्षीय समारोप करतेवेळी आमचं बालपण हरवलं आहे ते बालपण पुन्हा शोधण्यासाठी आम्ही तुमच्यात आलोय, असे प्रतिपादन केले. बाल रंगभूमी परिषदेच्या विविध उपक्रमाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी ‘एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भालाफेक’ या कवितेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
यावेळी जिल्हाभरातील अनेक शाळांनी समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य, वैयक्तिक वादन व वैयक्तिक समूह गायन या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. बालरंगभूमी परिषदेचे संजय पांडे, प्रमोद बल्लाळ, मनीषा उमरीकर, सचिन आडे, दिनकर देशपांडे, राजू वाघ, संदीप राठोड, शैलेश ढगे, लक्ष्मीकांत जोगेवार, सिद्धेश्वर जाधव, अनिकेत शेंडे, कुलदीप उंडाळकर, प्रकाश बारबिंड, रामदास कदम आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक त्र्यंबक वडसकर सूत्रसंचालन राजू वाघ व मनीषा उमरीकर यांनी केले तर आभार प्रकाश बारबिंड यांनी मानले.