Dharashiv Accident : सोलापूर–हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला असून यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. नळदुर्गकडे देवदर्शनासाठी निघालेल्या भक्तांची क्रूझर गाडी अचानक टायर फुटल्याने अनियंत्रित होऊन पलटी झाली आणि पुढे उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर जाऊन आदळली. धडकेत वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील सर्व प्रवासी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण उळे गावचे रहिवासी होते. पहाटेच्या सुमारास ही मंडळी क्रूझरमधून नळदुर्गकडे जात होती. गाडी महामार्गावर वेगात असतानाच पुढील टायर अचानक फुटला आणि वाहन रस्त्याच्या मध्यभागी उलटत गेलं. पलटी झाल्यानंतर क्रूझर थेट ट्रॅक्टरला धडकली आणि गाडीचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. काही प्रवासी वाहनाखाली दाबले गेल्याने मृतांचा आकडा वाढल्याचे पोलिसांनी सांगितले.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
अपघातानंतर परिसरात एकच आरडाओरड झाली. स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवासी वाहन चालकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना बाहेर काढून सोलापूरमधील सरकारी तसेच खासगी रुग्णालयांकडे रवाना केले. सात ते आठ जण गंभीर जखमी असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
महामार्गावरील या भीषण अपघातामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. पंचनामा सुरू असून टायर फुटण्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्राथमिक अंदाजानुसार टायरची गुणवत्ता, वाहनाचा वेग किंवा रस्त्यावरील अडथळा यापैकी कोणते तरी कारण कारणीभूत असावे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
या दुर्घटनेने दक्षिण उळे गावात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.