चार हजार रुपये रिटर्न ऊसाला भाव मिळावा यासाठी २४ तारखेला जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे – कॉ. कृष्णा सोळंके

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

Amazon

Amazon App Player

Download Now

माजलगाव /
ऊसदर प्रश्नी जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना एक होत आक्रमक पवित्रा घेत आहेत. जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी दि.२४ नोव्हेंबर रोजी ऊस दरासाठी होणाऱ्या अभूतपूर्व चक्काजाम आंदोलनात सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे व ऊसतोडी बंद ठेवून ऊसतोड व वाहतूक बांधवांनी सहकार्य करण्याचे व संभाव्य नुकसान टाळण्याचे आवाहन ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या वतीने व सर्व शेतकरी संघटनेचे वतीने करण्यात आले आहे. दि.२३ रोजी शेतकऱ्यांनी आपापल्या गावात टायर जाळून आपण सहभागी असल्याचा व यंत्रणांनी दखल घेण्याचा सुचक इशारा द्यावा.

गळाप हंगाम २०२५-२६ साठी बीड जिल्ह्यातील कोणत्याही कारखान्याने केंद्र शासनाच्या घोषित एफआरपीप्रमाणे ऊसदर किती देणार? याबाबत कोणतेही भाष्य किंवा प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेले नाही. यामुळे ऊसाचे दर आणि त्या दरांची घोषणा याबाबत जिल्हाभरात ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाला तो रस्त्यावर उतरला आहे. या अनुषंगाने ऊस उत्पादक शेतकरी प्रतिनिधी नी जिल्हाभरातील जवळपास सर्वच ऊस कारखान्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना एफ.आर.पी. प्रमाणे एक रक्कमी भाव मिळावा या गाळप हंगामासाठी किती दर देणार? हे विचारण्यासाठी शिष्टमंडळ भेटले. मात्र यातून अपेक्षित गोष्टी घडून आल्या नाहीत. म्हणून हा प्रश्न आणखी चिगळला आहे. या अनुषंगाने दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी माजलगाव येथील वसंतराव नाईक चौक परभणी नाका या ठिकाणी जोपर्यंत प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. ऊस कारखानदाराशी चर्चाकरून प्रश्न मार्गी लावण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला होता; मात्र त्याला कारखानदारांनी प्रतिसाद न देऊन ती संधी गमावली. आता चर्चा चौकात होईल त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात दीर्घकाळ संघर्ष करण्याच्या तयारीने यावे व सर्व ऊस कारखानदार व साखर सहसंचालक संभाजीनगर यांना चर्चेसाठी येथेच येणे भाग पडावे आता चर्चा टेबलावर नाही ऊस दराची चर्चा होणार भर चौकात हा पवित्र घेतला आहे,
त्यामुळे तालुक्यातील व मतदार संघातील सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय किसान सभा माजलगाव व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now