सिध्देश्वर मंदिरात श्रावणमास उत्सवाचे आयोजन

Spread the love

भस्मआरती, विवीध अलंकार, पुजा, पारायणाचे आयोजन
माजलगाव / प्रतिनिधी

शहरवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या सिध्देश्वर मंदिरात श्रावणमास उत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन महिणाभरात भस्मआरती, विवीध अलंकार, पारायणाचे आयोजन करण्यात आले असुन याचा भाविक – भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सुकाणू समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

सिंदफणा नदीकाठावर असलेल्या पुरातन सिध्देश्वर मंदिरात श्रावणमासानिमीत्त मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यावर्षीच्या श्रावण मास उत्सवात दि. 28 जुलैला प्रथम सोमवारी सहस्त्र बेल अर्चन व अरणेश्वर महादेव श्रृंगार, दि. 4 ऑगस्टला व्दितीय सोमवारी सहस्त्र कमळ पुष्प अर्चन व फुल बंगला श्रृंगार, दि. 11 ऑगस्टला तृतीय सोमवारी सहस्त्र भस्म अर्चन व बाबा बर्फानी श्रृंगार, 56 भोग नैवेद्य, दि. 18 ऑगस्टला चतुर्थ सोमवारी सहस्त्र पंचफुल अर्चन व जलविहार श्रृंगारसोबत एक हजार लाडु नैवेद्य चढविण्यात येणार आहे. त्याचबरोबर दि. 2 ते 4 ऑगस्ट दरम्यान शिवलीलामृत सामुहिक पारायण, दि. 3 ऑगस्टला रात्री रूद्र पुजा व सत्संग, दर श्रावण सोमवारी सुर्योदय ते सुर्यास्त असा अखंड रूद्र अभिषेक तर दि. 21 श्रावण मासिक शिवरात्री निमीत्त भगवंतास भस्मआरती असे धार्मीक कार्यक्रम होणार आहेत. याचा भाविक – भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सुकाणू समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *