
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात जाणवणाऱ्या गुलाबी थंडीने आता कडाका धरायला सुरुवात केली आहे. उत्तरेकडून सातत्याने येणाऱ्या थंड हवेच्या लहरींमुळे तापमानात लक्षणीय घट झाली असून, राज्यातील विविध भागांमध्ये गारठा वाढत आहे. हवामान खात्याने राज्यातील 8 जिल्ह्यांसाठी शीतलहरीचा येलो अलर्ट जारी केला आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
मुंबईत आज, 18 नोव्हेंबर रोजी, दिवसभर निरभ्र आकाश राहणार आहे. कमाल तापमान 33 अंश तर किमान 19 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही स्वच्छ आकाश आणि वाढता गारवा अशीच स्थिती राहणार आहे.

पुण्यात आज पूर्णपणे निरभ्र आकाश राहील. येथे किमान तापमान 11 अंशांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे, तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतही अशीच थंडगार हवा जाणवणार आहे.
मराठवाडा : शीतलहरींचा जोरदार इशारा
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांत हवामान खात्याने शीतलहरीचा इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तापमान 13 अंशांच्या आसपास तर कमाल तापमान 30 अंश राहील. नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उत्तर महाराष्ट्र : तापमानात मोठी घसरण
नाशिकमध्ये किमान तापमान 10 अंशांपर्यंत खाली येणार असून येथेही शीतलहरीचा इशारा देण्यात आला आहे. धुळे आणि जळगाव जिल्ह्यांतही गारवा वाढत असून हवामान विभागाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
विदर्भ : नागपुरातही गारवा वाढला
नागपुरात आज आकाश निरभ्र राहणार असून कमाल तापमान 27 अंश व किमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत येण्याची शक्यता आहे.
गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत तापमानात सतत घट होत असून सकाळ-संध्याकाळ गारठा विशेषतः अधिक जाणवतो आहे.
कुठल्या जिल्ह्यांना शीतलहरीचा येलो अलर्ट?
आज, 18 नोव्हेंबर रोजी खालील 8 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी—
- धुळे
- नाशिक
- जळगाव
- छत्रपती संभाजी नगर
- जालना
- परभणी
- बीड
- हिंगोली
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
शक्य तितका गरम कपड्यांचा वापर करावा
सकाळ-संध्याकाळ बाहेर पडताना सावधगिरी बाळगावी
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी
राज्यातील तापमान सातत्याने घसरत असल्याने पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.