जिंतूर /
जिंतूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. या शक्तीप्रदर्शनाने संपूर्ण शहरात निवडणूक उत्साहाची लाट उसळली.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सबिया बेगम कपील फारुखी यांच्यासह माजी आमदार विजय भांबळे, प्रेक्षा भांबळे, पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल करताना भव्य रॅली काढली. वाहनांचा ताफा, उंचावलेले पक्षाचे झेंडे, पताके, ढोल-ताशांचा दणदणाट आणि डिजेच्या ठेक्यावर बेभान नृत्य करणारे कार्यकर्ते—अशा वातावरणात उमेदवारी दाखल प्रक्रिया पार पडली.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
शहरातील मुख्य रस्त्यांवरून गेलेल्या या शक्तीप्रदर्शनामुळे ठिकठिकाणी गर्दी झाली होती. निवडणुकीचा ज्वर चढत असल्याचे चित्र या रॅलीतून स्पष्टपणे दिसून आले. राष्ट्रवादीच्या या दमदार प्रदर्शनामुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.