पालघर साधू हत्याकांडातील आरोपांचा विसर? मुख्य आरोपी म्हणून ज्यांच्यावर बोट ठेवले, त्यांनाच भाजपकडून पक्षप्रवेश

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

पालघर — २०२० मध्ये देशभरात लॉकडाऊन सुरू असताना पालघरच्या गडचिंचले येथे दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची जमावाने केलीली हत्या संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी ठरली होती. तेव्हाच्या ठाकरे सरकारवर भाजपने थेट बोट ठेवत, या प्रकरणात काशिनाथ चौधरी हे मुख्य आरोपी असल्याचा ठपका ठेवला होता. मात्र, आता त्याच काशिनाथ चौधरी यांना भाजपने पक्षात घेतल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

Amazon

Amazon App Player

Download Now

रविवारी (१६ नोव्हेंबर) डहाणू येथे झालेल्या मोठ्या शक्तिप्रदर्शनादरम्यान चौधरी यांनी कमळ हाती घेत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. खासदार हेमंत सावरकर आणि जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात चौधरींसोबत तब्बल ३ हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपची वाट धरली.

यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तीव्र प्रतिक्रिया देत, “ज्यांच्यावर गंभीर आरोप ठेवून भाजपने संपूर्ण राज्यात आंदोलन केले, त्यांनाच आज पक्षात घेतले जाते, मग त्यावेळचे आरोप खरे होते की आजचा प्रवेश?” असा सवाल उपस्थित केला आहे.

नेमके प्रकरण काय?

१६ एप्रिल २०२० रोजी दोन साधू—कल्पवृक्षगिरी महाराज व सुशीलगिरी महाराज—तसेच त्यांचे वाहनचालक सुरतच्या दिशेने निघाले होते. त्याच वेळी परिसरात “लहान मुले पळवणारी टोळी फिरते” अशी अफवा पसरलेली होती.

गडचिंचले येथे जमलेल्या जमावाने साधूंच्या गाडीला अडवले, चौकशीदरम्यान संशय घेत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली, आणि ही मारहाण इतकी भयावह होती की तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. तपासात पोलिसांनी सुमारे २०० जणांना अटक केली. एकूण १०८ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. तेव्हा भाजपने ठाकरे सरकारवर पुरावे दडपल्याचा आरोप करत मोठा राजकीय सूर लावला होता.

काही वर्षांपूर्वी ज्यांना ‘मुख्य आरोपी’ म्हणत आक्रमक राजकारण करण्यात आले, त्यांनाच आता मोठ्या शक्तिप्रदर्शनाद्वारे पक्षात सामावून घेण्यात येत असल्याने या प्रकरणाच्या राजकीय पार्श्वभूमीला नव्याने वाचा फुटली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now