बीड – नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर बीडच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर व डॉ. सारिका क्षीरसागर यांनी रविवारी (दि. १६) छत्रपती संभाजीनगर येथे भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत क्षीरसागर दाम्पत्याने भाजपचा झेंडा हाती घेतला. हा प्रवेश अजित पवारांसाठी मोठा धक्का समजला जात आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
बीड नगरपरिषदेच्या रणसंग्रामात क्षीरसागर दाम्पत्याच्या प्रवेशामुळे भाजपला अनपेक्षित बळ मिळाले आहे. आतापर्यंत ‘व्हेंटिलेटर’वर असल्याची टीका होणाऱ्या भाजपच्या बीडमधील राजकारणाला नवसंजीवनी मिळाल्याचे मानले जाते. याचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता व्यक्त होत असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही याचा व्यापक परिणाम जाणवेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
प्रवेशावेळी मुख्यमंत्री फडणवीस व मंत्री पंकजाताई मुंडे यांनी क्षीरसागर दाम्पत्याचे औपचारिक स्वागत केले. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, नगरसेवक शुभम धूत यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
पक्षप्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना डॉ. योगेश क्षीरसागर म्हणाले,
“पंकजाताई मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला. बीड नगरपरिषदेसाठी जागा महिलांसाठी राखीव असल्याने आम्ही कमळ चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरणार आहोत. भाजपची संघटना, आमचे कार्यकर्ते आणि जनतेचा पाठिंबा मिळून आम्ही दमदार लढत देऊ.”
राष्ट्रवादी सोडण्यामागे काही ठोस कारणे असल्याचे ते म्हणाले. “आता मोकळा श्वास घेत आहोत,” असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे पूर्वपक्षातील नाराजी व्यक्त केली.
बीडमध्ये बाहेरून नेते आणून प्रयोग केले जात असल्याची टीका करत त्यांनी पुढे म्हटले,
“बीडकरांनी अशा प्रयोगांना नेहमीच हाणून पाडले आहे. हा प्रयोगही बीडकर निश्चितच हाणून पाडतील. बीडचा स्वाभिमान कोणीही डळमळीत करू शकत नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, क्षीरसागर दाम्पत्याला निवडणुकीत पक्षाची संपूर्ण ताकद देण्याचे आश्वासन भाजपकडून देण्यात आले असून मुख्यमंत्री फडणवीस व पंकजाताई मुंडे स्वतः या निवडणुकीत खंबीरपणे पाठिंबा देणार आहेत.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
बीडच्या आगामी नगरपरिषद निवडणुकीचे समीकरण एकाच झटक्यात बदलवण्याची क्षमता या प्रवेशामुळे निर्माण झाली असून पुढील काही दिवसांत राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.