आ.प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा पदासाठी आतार मेहरुनबी खलील पटेल यांची उमेदवारी केली जाहीर
१३ प्रभागातील २६ नगरसेवकांच्या उमेदवा-या केल्या जाहिर

माजलगाव /
नगरपालिकेची रणधुमाळी सुरू असुन अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवा-या आ.प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषदेत जाहिर करत नगरपालिका निवडणुकीत माजलगावकर राष्ट्रवादीला साथ आणि समर्थन देतील असा विश्वासही आ.प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
येथील सुंदरराव सोळंके महाविद्यालयात दि. १५ नोव्हेंबर शनिवार रोजी सायंकाळी ४:०० वाजता आयोजित पत्रकार परिषदेत आ. प्रकाश सोळंके यांनी राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदासाठी
आतार मेहरुनबी खलील पटेल (ना.मा.प्रा.महीला राखीव) यांच्यासह १३ प्रभागातील २६ नगरसेवक पदाच्या उमेदवा-या जाहिर केल्या. दरम्यान यावेळी पालिका ताब्यात असतांना शहरात केलेली स्वच्छता, पाणीपुरवठ्यासह विवीध विकासकामांचा पाढा त्यांनी वाचला. त्याचबरोबर आगामी काळात पालिका ताब्यात आल्यास निश्चीतच भुमिगत नाल्या, आठवडी बाजाराच्या जागेचा प्रश्न,नाट्यगृह उभारणीसह अनेक विकासकामे पुर्णत्वाकडे घेवुन जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले. या पत्रकार परिषदेला सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन जयसिंग सोळंके,माजी नगराध्यक्ष नासेर खाॅ पठाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे, तालुकाध्यक्ष संभाजी शेजुळ, खलील पटेल, कल्याण आबुज, डॉ.वसिम मनसबदार,अच्युत लाटे यांची उपस्थिती होती.
या नावांची केली घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे ना.मा.प्रा.महिला राखीव उमेदवार निरोनिसा खलील आत्तार पटेल हे तर प्रभाग १ मध्ये रेखा सरोदे,मालती पाठक,प्रभाग २ मध्ये रत्नमाला राकेश साळवे,शेख इम्रान, प्रभाग ३ मध्ये राज सय्यद नूर,पठाण नाजीया जुनेदखान,प्रभाग ४ मध्ये नवनाथ गायकवाड, कलावती फरके, प्रभाग ५ मध्ये मनिषा रेदासनी, राहुल लंगडे, प्रभाग ६ लता लाटे, शेख मजीद, प्रभाग ७ मध्ये वैशाली प्रशांत शेटे,विजय शिंदे, प्रभाग ८ मध्ये यास्मिन तांबोळी, शेख तौफिक, प्रभाग ९ मध्ये मोसिन जलील बागवान, सुनीता प्रल्हाद होके, प्रभाग १० मध्ये राधिका घाडगे,दिनकर होके,प्रभाग ११ मध्ये कोमल वारकड,मतीन शेख,प्रभाग १२ मध्ये उषा बनसोडे, सय्यद रफिक अली, प्रभाग १३ मध्ये सुदामती पोळ, रेहानाबी शेख यांच्या उमेदवाऱ्या जाहीर झाल्या आहेत.