Verification: 1fe30fb203b45d5d
माजलगाव : दर्शन डोंगरे
माजलगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत नगरपरिषदेच्या १,२, ४,१२,१३ या प्रभागांतील इच्छुक उमेदवारांनी बुधवार दिनांक १२ रोजी सकाळी ठिक ११ वाजता शहरातील व्यंकटेश हॉटेल मध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष विजय दादा साळवे यांनी केले आहे.

या बैठकीत पक्षाचे आगामी निवडणूक धोरण, उमेदवार निवड प्रक्रिया, तसेच जनसंपर्क मोहिमेचा आराखडा यावर सविस्तर चर्चा होणार आहे. रिपब्लिकन सेनेच्या विचारसरणीवर आधारित संघटित आणि प्रभावी पद्धतीने निवडणुकीचा सामना करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात येईल.
बैठकीस सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहनही विजय साळवे यांनी केले आहे.