आसपासचा परिसर ही हादरला
दिल्लीमध्ये मेट्रो स्टेशन जवळ हा स्पोट झाला
पोलिस प्रशासनाने रात्री 9.30 वाजता झालेल्या स्पोट दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात एकूण 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

या स्फोटातील झालेल्या घटनेवर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. भारतातील इराणच्या दूतावासाने दिल्लीमध्ये झालेल्या घटनेवर शोक व्यक्त केलेला आहे.
त्याचबरोबर बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स या देशांनी या घटनेवर शोक व्यक्त केलेला आहे.
अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की संध्याकाळी सहा वाजून 55 मिनिटांनी फोन आला
लाल किल्ल्या जवळील मेट्रो स्टेशन गेट नंबर एक समोर एका गाडीमध्ये स्फोट झाल्याची फोनवरून माहिती मिळाली असे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले
या स्फोटा मुळे जवळील तीन ते चार वाहनांना आग लागली. तसंच, जवळ उभ्या असलेल्या इतर वाहनांचेही बरेच नुकसान झाल्याची माहिती आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रुग्णालयात जाऊन जखमींना भेट दिली व चौकशी केली. तसंच मध्यरात्री 12 वाजेच्या दरम्यान अमित शहांनी घटनास्थळी जात आढावाही संपूर्ण घेतला.
दिल्ली अग्निशामक दलाला माहिती मिळाल्याबरोबर अग्निशामक दलाच्या एकूण सात गाड्या स्पोर्ट झालेल्या ठिकाणी मेट्रो स्टेशन जवळ पाठवण्यात आल्या
स्फोटामध्ये जखमी झालेल्यांना लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आले
अमेरिकन दूतावासाने जारी केल्या सूचना
दिल्लीतील स्फोटा नंतर अमेरिकन दूतावासाने अलर्ट केला आहे व सूचना दिल्या आहेत. लाल किल्ला, चांदणी चौक त्याच बरोबर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, अशा सूचना अमेरिकन दूतावासाने जारी केल्या आहेत. अमेरिकन दूतावासाने पर्यटन स्थळांना जाताना सावधतेचा इशारा दिला आहे.
पंतप्रधान, गृहमंत्री काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्सवर पोस्ट करत या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे

“आज संध्याकाळी दिल्लीतील स्फोटात ज्यांनी आपल्या जवळचे गमावले आहेत, त्यांच्या प्रति मी शोक व्यक्त करतो. जखमी झालेल्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं,अशी ही प्रार्थना. प्रशासनाकडून पीडितांना सर्व आवश्यक मदत पुरवली जाईल,” असं देखील पंतप्रधान मोदी म्हणाले.
त्याचबरोबर गृहमंत्री शाह आणि इतर अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.
बॉम्बस्फोटात अनेक वाहनांचं नुकसान झाल्याची आहे
गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलचा आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यापूर्वी त्यांनी घटनेबाबतही माहिती दिली
“आज संध्याकाळी 7 च्या दरम्यान दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सुभाष मार्ग चौकात कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात काहीजण जखमी झाले असून काही गाड्यांचं नुकसान झालं आहे. प्राथमिक माहितीनुसार काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे,” असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
एनएसजी आणि एनआयएची पथकं आणि एफएसएलनेही सखोल चौकशी सुरू केली आहे. परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. मी स्वतः दिल्ली पोलीस आयुक्त आणि स्पेशल ब्रँचच्या प्रमुखांशीही बोललो आहे. दिल्ली पोलीस आयुक्त आणि स्पेशल ब्रँचचे प्रमुख घटनास्थळी पोहोचले आहेत,” अशी ही माहिती त्यांनी दिली
आम्ही सर्व शक्यतांचा तपास चालू आहे सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून चौकशी केली जाणार आहे, असंही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

या घटनेवर दिल्लीचे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
दिल्ली स्पोट प्रकरणी दिल्ली चे पोलिस आयुक्त सतीश गोलचा यांनी माध्यमांशी बोलताना असे सांगितले की, “आज 6.52 वाजता सौम्य गतीनं चालणारी गाडी सिग्नलवर थांबली होती. त्या गाडीत स्फोट झाला व त्या स्फोटामुळे आसपासच्या गाड्यांनाही बऱ्याच प्रमाणात नुकसान झालं.
एफएसएल, एनआयए अशा सर्व यंत्रणा इथे उपस्थित आहेत. काही लोकांचा मृत्यू झाला तर काही जखमी आहेत.
आम्ही झालेल्या परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहोत. गृहमंत्र्यांनीही आम्हाला फोन केला होता. त्यांना वेळोवेळी माहिती दिली जात आहे.”
दरम्यान, दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत पोलिसांकडून सर्वत्र खबरदारीचा इशारा देण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दिली आहे.
या स्फोटा मुळे स्थानिक परिसरातील इमारतीच्या खिडक्या देखील हादरल्या’
राजधर पांडे नावाच्या एका स्थानिक रहिवाशानं सांगितलं की, “आम्ही घराच्या टेरेसवरून आगीच्या ज्वाला पाहिला. त्यानंतर काय चाललं आहे, ते पाहण्यासाठी मी खाली आलो. खूप मोठा आवाज झाला. इमारतीच्या खिडकीचे काच हादरले. माझे घर गुरुद्वाराजवळच आहे.”
तर, वली उर रहमान म्हणाले की, “स्फोट झाला तेव्हा मी दुकानात बसलो होतो. अचानक एवढा मोठा स्फोटाचा आवाज झाला जो मी आजवर ऐकला नव्हता. त्या स्फोटाच्या आवाजानंतर मी तीन वेळा खाली पडलो. यानंतर, आजूबाजूचे सर्व लोक पळून जाऊ लागले.”

काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, “लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ कारमध्ये झालेल्या स्फोटाची बातमी अत्यंत दुःखद आहे. प्राथमिक माहितीनुसार अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.”
“या दुःखाच्या घटनेप्रसंगी आम्ही शोकाकुल कुटुंबांसोबत उभे आहोत. जखमींसाठी आम्ही प्रार्थना करतो. सरकारने घटनेची सखोल आणि त्वरित चौकशी करावी.”