अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यासोबत नेमकं काय घडलं? जाणून घेऊया सविस्तर
सिंधुदुर्ग जिल्ह्या मधील (सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ) मेडिकल कॉलेज प्रवेशासाठी आलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याकडे हॉस्टेल व मेससाठी तब्बल 8 लाख 20 हजार रुपयांची मागणी ही मेडिकल कॉलेज ऑफ प्रशासनाने केल्याचे तक्रार समोर आलेली आहे.
यावरच न थांबता विद्यार्थ्याला बळजबरीने सीईटी सेल ला ई-मेल करायला लावून सांगितले की माझ्या वैयक्तिक कारणास्तव प्रवेश रद्द करावा असा विद्यार्थ्यांनी आरोप केलेला आहे
ईमेल जी तक्रार आहे त्या विद्यार्थ्यांना असे म्हटले आहे की आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये दिवसभर दाबून ठेवले व त्यानंतर सीईटी सल्ला बळजबरीने ई-मेल करायला लावला आणि आम्ही स्वतःहून वैयक्तिक कारणास्तव प्रवेश रद्द करण्याची विनंती केलेली आहे व त्यानंतर आम्हाला तिथून सोडून दिले असा विद्यार्थ्यांनी सांगितले
या सर्व प्रकरणावर त्या विद्यार्थ्याने सीईटी सेल आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय यांच्याकडे तक्रार केली आहे की संचालनालयाने या सर्व प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन सदस्य समिती स्थापन केली आहे . दरम्यान महाविद्यालयाच्या प्रशासनाने सर्व आरोप फेटाळले आहेत.
या मेडिकल कॉलेजचे संस्थापक आणि मुख्य ट्रस्टी हे माजी मंत्री नारायण राणे हे आहेत. त्यामुळे विरोधी पक्षातील सर्व नेत्यांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे मात्र अद्यापही नारायण राणे यांनी कसल्याही प्रकारचे उत्तर दिलेले नाही.
हे सर्व प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घेऊया.
गडचिरोली जिल्ह्यामधील छल्लेवाडा गावा मधे राहणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याने वैद्यकीय प्रवेशासाठी लागणारी नीट परीक्षेत 420 गुण मिळवले. अत्यंत साधारण व प्रतिकूल परिस्थितीतून डॉक्टर होण्याचा स्वप्न घेऊन आलेला हा विद्यार्थी गडचिरोली वरून सिंधुदुर्ग पर्यंत आला मात्र त्या विद्यार्थ्यासोबत आहे असा सगळा प्रकार घडला.
वैद्यकीय महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीनंतर संबंधित विद्यार्थ्याचा नंबर सिंधुदुर्ग येथील सिंधुदुर्ग शिक्षण मंडळ या संस्थेमध्ये लागला. त्यानुसार प्रवेशासाठी विद्यार्थी त्याठिकाणी पोहचला सुद्धा. मात्र याठिकाणी प्रवेशासाठी 8 लाख 70 हजार रुपये शुल्क भरण्यासाठी ची मागणी केली.गेल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितले त्याचबरोबर या शुल्काचे विवरण देण्यास सुद्धा तिथल्या कार्यालयाने नकार दिल्याचं विद्यार्थ्याने अष्टपणे सांगितले
विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार डीएमईआरला केलेल्या तक्रारीनुसार, ‘मे 2025 मध्ये झालेल्या नीट परीक्षेत मला 420 मार्क्स मिळाले होते त्यानुसार माझा स्टेट रँक 13,978 आणि कॅटेगरी रँक SC-855 आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या राउंडमध्ये माझा नंबर एसएसपीएम कॉलेज सिंधुदुर्ग येथे लागला. दुसऱ्या राउंड वेळी पण त्यांनी 9 लाख 20 हजार रुपये फी सांगितली.व पुढच्या राउंड मधे वरील कोणते तरी कॉलेज मिळेल म्हणून मी तिथे एडमिशन घेतले नाही.’
तिसऱ्या राउंडमध्ये ही परत याच ठिकाणी नंबर लागला. यावेळी मात्र मी वेबसाइट वर पाहिले तर मला 50,000 रुपये फी आहे असं कळालं. सदर रकमेचा डीडी घेऊन मी तिकडे गेलो असता त्यांनी बाकी रक्कम चेकने (8 लाख 70 हजार) देण्यास देण्यास सांगितले. ही रक्कम सक्तीने हॉस्टल मध्ये राहण्यास तसेच मेसमध्ये जेवण्यासाठीची सर्व आहे असे म्हटले. पण सीईटीनुसार हॉस्टेल आणि मेस सक्तीची नसते म्हणून त्यांना विचारले तर त्यांनी सांगितले की, या ठिकाणी असेच असते.
त्या विद्यार्थ्याने त्यावेळी पैशांची काही सोय करता येईल का याची चाचपणी करत असताना त्यांना आम्ही फीचे विवरण लेखी स्वरुपात देखील मागितले. पण त्यांनी कसलीही दाद दिली नाही. ऑफिसमध्ये जाताना मोबाईल पण घेऊन जाऊ दिला नाही. त्यामुळे त्यांनी दाखवलेला 8 लाख 70 हजार रुपयांचा फोटो घेता आला नाही. त्यानंतर त्यांनी आम्हाला 4.30 वाजता ऑफिसमध्ये बोलावून बसवून ठेवलं. फोनपण घेऊ दिला नाही. व त्याठिकाणी आम्हाला डांबून ठेवलं. तिथेच 6 वाजता आमच्याकडून बळजबरीने एक मेल सीईटी सेलला पाठवण्यास भाग पाडलं . व त्यानंतर मग सोडून दिले,’ आबा त्या विद्यार्थ्याच्या तक्रारीमध्ये असे नमूद आहे .
यानंतर विद्यार्थ्याने सीईटी सेलला एक ईमेल केल्याचं स्पष्टपणे सांगितलं.
मेडिकल कॉलेज वाल्यांनी माझ्याकडून बळजबरीने ई-मेल लिहून सीईटी सेल ला पाठवला होता व कॉलेजच्या ठिकाणी मला त्यांच्या ऑफिसमध्ये दाबून ठेवले होते व आता तो ई-मेल रद्द करावा
“स्कॉलरशिपनुसार ट्यूशन आणि डेव्हलपमेंट शुल्क माफ असते. त्यात हॉस्टेल आणि मेसची फी लिहिली नव्हती. 9 लाख 20 हजार इतकी संपूर्ण फी आहे.
या बाबतीमध्ये कॉलेज प्रशासनाने उल्लेख करायला पाहिजे होता की कॉलेजमध्ये तुम्हाला होस्टेल हे कंपल्सरी आहे की नाही व यामध्ये तुम्हाला कोणते कोणते चार्जेस लागतील व कशाप्रकारे लागणार आहेत या सर्व प्रकाराची सविस्तर माहिती देणे गरजेचे होते मात्र त्यांनी सांगितले की तुम्हाला याच ठिकाणी राहावे लागेल.
त्या विद्यार्थ्यांनी सांगितले की “4 नोव्हेंबर प्रवेशाची शेवटची तारीख होती आणि त्याचे वरच्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. लेखी फी स्ट्रक्चर मागितलं होतं पण ते सुद्धा लिहून द्यायला तयार नव्हते. आम्ही एखाद्या स्वयंसेवी संस्थेकडून फीसाठी मदतीसाठी प्रयत्न केले असते पण फीचं स्ट्रक्चरचं दिलं गेलं नाही. त्या ठिकाणी झोपा मोबाईल वापरायला सुद्धा परवानगी नव्हती.
त्या कार्यालयामध्ये काही विचारायला गेल्यानंतर मोबाईल बाहेरच काढून घेतात. आम्ही दोन- तीन तास तिथेच बसून होतो. पोर्टल साडेपाचपर्यंतच होतं. त्यांनी सहा-सात वाजेपर्यंत डांबून ठेवलं होत व त्यांनी सांगितलं की सीईटी सेलला मेल करा की आमच्या वैयक्तिक अडचणीमुळे काॅलेजला प्रवेश घेता येणार नाही . सेक्युरीटीला सांगितलेलं होतं की ह्यांना मेल करेपर्यंत तिथेच थांबवा त्या विद्यार्थ्याला तंबी दिली आणि त्या ठिकाणी डांबून ठेवलं
त्या विद्यार्थ्याने त्याची तक्रार सीईटी सेल, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय , महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडे तक्रार केली आहे ई-मेल द्वारे
या तक्रारीनंतर चौकशी समिती
या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने महाविद्यालयाच्या चौकशीसंदर्भात समिती नेमली असून संबंधित सदस्यांनी महाविद्यालयाची भेट घेतल्याचं संचालक अजय चंदनवाले यांनी सांगितलं.
“विद्यार्थ्याच्या नावाने आलेला मेल पोहचला आहे. सत्यता पडताळणीसाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. त्या संबंधित समितीने महाविद्यालयाची भेट घेतली आहे. आता त्यांच्याकडून अहवाल येईल,” अशी माहिती वैद्यकीय संचालनालयाचे संचालक अजय चंदनवाले यांनी सांगितली.
या दरम्यान, सीईटी सेलकडून सुद्धा यासंदर्भात सोमवारी (10 नोव्हेंबर) बोलवलं असल्याच विद्यार्थ्याने सांगितले.
कॉलेजची प्रतिक्रिया
एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालयातील वंदना गावपांडे यांनी विद्यार्थ्याने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.
त्यांनी असे सांगितलं की, “एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शुल्क नियामक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या शुल्काचे व्यतिरिक्त कोणत्याही शुल्काची मागणी करण्यात आली नाही. त्याचबरोबर हॉस्टेल आणि मेस सुविधा ही ऐच्छिक असून त्याबाबत उमेदवारास कोणत्याही प्रकारची या ठिकाणी सक्ती केली जात नाही
“एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालयात महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे नियमन) अधिनियम 2015 मधील सर्व तरतुदींचे तंतोतंत पालन केले जाते. मेडिकल कॉलेज प्रशासनाने कोणत्याही विद्यार्थी कडून जबरदस्तीने ईमेल करवून घेतला नाही.
“एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालय हे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, शुल्क नियामक प्राधिकरण, प्रवेश नियामक प्राधिकरण आणि संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई यांनी यांनी दिलेल्या सर्व नियमाने कटिबद्ध पद्धतीने आम्ही चालवतो
तसंच एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालयाच्या वेबसाईटनुसार, या संस्थेचे मुख्य ट्रस्टी हे माजी मंत्री आणि खासदार नारायण राणे असून नीलेश राणे हे उपाध्यक्ष आहेत तर मंत्री नीतेश राणे हे संस्थेचे सचिव आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी एक्सवर ट्विट केले आहे की, सरकार या वैद्यकीय महाविद्यालयावर कारवाई करणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे .
त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “उठा उठा घोटाळ्याची बातमी आली, चौकशी करून क्लीन चीट देण्याची वेळ झाली. सिंधुदुर्गातील एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाइफटाइम हॉस्पिटल या नारायण राणे यांच्या कॉलेजने गडचिरोलीच्या विद्यार्थ्याकडे प्रवेशासाठी नऊ लाख 20 हजार रुपयांची अवैध मागणी करून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केली जात आहे. राजकीय वरदहस्त असलेल्या या मेडिकल कॉलेज वर मुख्यमंत्री फडणवीस कारवाई करणार का?
तसंच वंचित बहुजन आघाडीनेही या सर्व प्रकरणांमध्ये हस्तक्षेप घेत यासंदर्भात आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे.
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ता प्रशांत बोराडे यांनी एक्स वर ट्वीट करत माध्यमावर दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, “राज्यात मेडिकल कॉलेजच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. गडचिरोली येथील अनुसूचित जमातीच्या एका विद्यार्थ्याला सिंधुदुर्ग येथील नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता. नियमानुसार त्याची फी पन्नास हजार रुपये होती, परंतु तेथील प्रशासनाने विद्यार्थ्याकडून नऊ लाख रुपयांची मागणी केली आणि प्रवेश नाकारला.
प्रवेश नाकारल्यानंतर प्रशासनाने विद्यार्थ्याला आणि त्याच्या भावाला एक दिवस डांबून ठेवून नऊ लाख रुपयांची मागणी केली. प्रवेश नाकारून, विद्यार्थ्याकला साईटी सेलला ‘माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी प्रवेश घेऊ इच्छित नाही’ असा मेल बळजबरीने करायला लावला. शासकीय फी प्रमाणे डीडी काढलेला असूनदेखील विद्यार्थ्याला डांबून ठेवण्यात आले यातून आधुनिक जातिवाद स्पष्टपणे दिसून येतो.”
सम्यक विद्यार्थी आंदोलन विद्यार्थ्याला घेऊन आंदोलन करणार आहे. सिंधुदुर्गमधील मेडिकल कॉलेज आणि नारायण राणे यांनी अशा प्रकारे विद्यार्थ्यांवर अन्याय केला, तर आम्ही गप्प बसणार नाही,” असे बोराडे यांनी म्हटले.
यासंदर्भात मंत्री नारायण राणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
संबंधित संस्थेवर अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय दाभाडे यांनी केली आहे. तसंच विद्यार्थ्याला एमबीबीएस प्रवेशासाठी पुढच्या प्रवेश फेरीसाठी पात्र करावं अशीही मागणी केली जात आहे.
संजय दाभाडे यांनी म्हटलं, “अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याला मेडिकल कॉलेजमध्ये डांबून ठेऊन त्याला एमबीबीएस प्रवेशापासून वंचित ठेवणाऱ्या नारायण राणेंच्या संस्थेवर अॅट्रॉसिटीज कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. मंत्री नारायण राणेंच्या मालकीच्या वैद्यकीय महाविद्यालयात गडचिरोलीतील एका अनुसूचित जातीतील (SC) विद्यार्थ्यांला कॉलेजमध्ये डांबून ठेवण्यात आले व त्याच्यावर दबाव आणून त्याला एमबीबीएस च्या प्रवेशापासून वंचित ठेवण्यात आले.
प्रवेशासाठी केवळ 50 हजार रुपये लागणार असताना त्याच्याकडून 9 लाख रुपयांची मागणी केली. दरम्यान, त्या विद्यार्थी त्याच्या भावावर दबाव आणून त्यांना सीईटी सेलला ईमेल करण्यास प्रवृत्त करण्यात आले.” मी व्यक्तिगत कारणास्तव प्रवेश घेऊ शकत नाही, त्यात संस्थेची काहीच चूक नाही ” असा ईमेल करण्याची जबरदस्ती केली. त्यानंतर विद्यार्थी व त्याच्या भावाची सुटका झाली.”