दत्ता सातपुते राष्ट्रीय समाज पक्ष तालुका संपर्कप्रमुख यांच्या (सौ.मीना दत्ता सातपुते) यांची सादोळा गणा मधुन उमेदवारी दाखल होणार

Spread the love

सातपुते यांची ओबीसी उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली तर ठरू शकते अनेकांची डोकेदुखी

Verification: 1fe30fb203b45d5d

माजलगाव / प्रतिनिधी
राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका संपर्कप्रमुख दत्ता सातपुते (सौ.मीना दत्ता सातपुते) यांनी सादोळा गणा मधून राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणार आहेत…अशी मागणी सादोळा गणा मधील सामान्य मतदारांच्या वतीने केली जात आहे. युवा असल्याने या सादोळा गणा च्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. जर सातपुते यांची राष्ट्रीय समाज पक्षाकडून उमेदवारी भरण्यात आली तर ती अनेक प्रस्थापित लोकांचे डोकेदुखी ठरू शकते असा सुर उमटू लागला आहे …
प्रामुख्याने सादोळा या गणा मध्ये ओबीसी वर्ग बहु संख्य आहे. राष्ट्रीय समाज पक्षाकडून सादोळा पंचायत गण या ठिकाणी दत्ता सातपुते (सौ.मीना दत्ता सातपुते) यांनी ओबीसी उमेदवार म्हणून सादोळा गणातून उमेदवारी दाखल केली तर सातपुते हे जनता जनार्दनाच्या आशीर्वादावर बहुमताने विजयी होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सातपुते यांना सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. सामान्य कुटुंबातून आल्याने त्यांना गोरगरिबांच्या व सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव आहे. एक सकारात्मक आणि कामाप्रती ध्येयवेढा युवा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तळागाळातून आल्याने आणि वाडी- वस्ती-तील लोकांचा विश्वास व राष्ट्रीय समाज पक्षाचे विश्वासू कार्यकर्ते आणि ओबीसी समाजातील नेतृत्व म्हणून सातपुते काम करतात. सातपुते यांनी राष्ट्रीय समाज पक्षा कडून सादोळा गणा मधून निवडणूक लढवावी असा सामान्य मतदारांनी आग्रह केलेला आहे. ओबीसी समाजाने आपली वज्रमूठ आवळल्यास सातपुते यांचा विजय कोणीही रोखू शकत नाही .

Amazon

Amazon App Player

Download Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now