छ. संभाजीनगर:
जायकवाडी धरण पैठण येथून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. शनिवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८.३० ते ९.०० या वेळेत जायकवाडी धरणातील १० ते २७ क्रमांकाचे एकूण १८ दरवाजे प्रत्येकी अर्धा फूट वर करण्यात येऊन आता हे दरवाजे ३.५ फूटांवर स्थिर ठेवले आहेत.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यामुळे अतिरिक्त ९४३२ क्युसेक पाणी हे गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे सांडव्याद्वारे होणारा एकूण विसर्ग ५६ हजार ५९२ क्युसेकवरून वाढून तब्बल ६६ हजार २४ क्युसेकपर्यंत गोदावरी नदी पात्रात विसर्ग होणार आहे
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि पाण्याची वाढती आवक लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग, नाथनगर (उत्तर), पैठण यांनी ही माहिती दिली आहे . येत्या काही तासांत आवक व पावसाच्या स्थितीनुसार विसर्गात आणखी वाढ कमी अथवा घट होऊ शकते, असेही जायकवाडी धरण प्रशासनाने सांगितले.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
दरम्यान, अचानक वाढलेल्या विसर्गामुळे गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.नदीकाठच्या वस्ती, शेतशिवार तसेच पूरग्रस्त भागाजवळील लोकांनी अनावश्यक धोकादायक ठिकाणी न जाण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.