गोदावरी नदीकाठ च्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
छ. संभाजीनगर
जायकवाडी धरणातून पाण्याच्या विसर्गामध्ये आणखी वाढ करण्यात आलेली आहे. आज दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८:४५ ते ९:०० या वेळेत धरणाचे आपत्कालीन दरवाजा क्रमांक १ ते ९ हे अर्धा फूट वरून थेट ३ फूटपर्यंत उघडण्यात येणार असल्याची माहिती पूर नियंत्रण कक्षाने दिली आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
या निर्णयामुळे अतिरिक्त ४७१६ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जाणार आहे. सध्या १८ नियमित व ९ आपत्कालीन असे एकूण २७ गेट्समधून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडले जात आहे त्यातून तब्बल १ लाख ८४६८ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. नवीन वाढलेल्या विसर्गानंतर तो थेट १ लाख १३ हजार १८४ क्युसेकपर्यंत पोहचला आहे
पूर नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पैठण येथील जायकवाडी धरणामध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने मुळे विसर्ग वाढविण्याशिवाय पर्याय उरत नाही. पाण्याची आवक-जावक लक्षात घेऊन विसर्गात वेळोवेळी बदल करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आलेले आहे
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
या सततच्या पाण्यामुळे गोदावरी पात्रालगत असलेल्या बीड, औरंगाबाद, जालना व परभणी जिल्ह्यातील गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
स्थानिक प्रशासन, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा हाय अलर्टवर असून नागरिकांना नदी पात्रात न जाण्याचे, तसेच कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तातडीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.