Majalgaon Dam : माजलगाव धरणातून 96 हजार 866.46 क्युसेक पाण्याचा विसर्ग ; नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

Majalgaon Dam बीड : माजलगाव धरणाच्या क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. वाढलेली पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनाने धरणातील वक्रद्वार उघडण्याचा निर्णय घेतला आहे.
शनिवार, दि. 27 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2.30 वाजता माजलगाव धरणाचे वक्रद्वार क्रमांक 11, 6, 16, 10, 12, 9, 13, 8, 14, 7 व 15 ही गेट अर्धा मीटरने (0.50 मीटर) उघडण्यात येणार असल्याची ही माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.

Amazon

Amazon App Player

Download Now

सध्या धरणाच्या सांडव्यावरील 11 वक्रद्वारे 2.50 मीटरने सुरू असून, त्याद्वारे तब्बल एकूण 96 हजार 866.46 क्युसेक (2742.927 क्युमेक्स) इतका पाण्याचा सध्या विसर्ग सिंधफणा नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. पाणलोट क्षेत्रातील आवक वाढत असल्याने आवश्यकतेनुसार विसर्ग वाढवणे अथवा कमी करणे बाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या वाढीव विसर्गामुळे सिंधफणा व गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठावरील तसेच पुरग्रस्त गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे आणि कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नये, असे आवाहन माजलगाव प्रकल्प पूरनियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now