स्वदेशीचं स्वप्न आणि TVS ची गोष्ट
ब्रिटीशांच्या दडपशाहीचा काळ… भारत अजून गुलाम. अशा वेळेस एका तरुणाच्या मनात एक स्वप्न उगवलं – “स्वतःचं काहीतरी घडवायचं, जे भारताचं नाव उंचावेल”. त्या तरुणाचं नाव होतं – टी.व्ही. सुंदरम अय्यंगार.

- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
२२ मार्च १८७७. तामिळनाडूच्या थिरुनेलवेली जिल्ह्यात अय्यंगार यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच शिकण्यात हुशार. वकिलीचं शिक्षण घेतलं आणि वकिलीला सुरुवातही केली. पण मन मात्र अस्वस्थ. कायद्यात त्यांना गती मिळाली नाही. म्हणून बँकेच्या नोकरीत दाखल झाले. चांगली नोकरी, स्थिर भविष्य, पण मन मात्र बेचैन… कारण त्यांच्या मनातली ज्योत नोकरीने विझत नव्हती.
“माझं काहीतरी स्वतःचं असलं पाहिजे…” – हा विचार सतत त्यांना त्रास देत होता. आणि मग त्यांनी मोठा निर्णय घेतला – बँकेच्या नोकरीला रामराम!
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
सुरुवात केली सायकल दुरुस्तीच्या व्यवसायाने. पण पहिल्याच प्रयत्नात अपयश. नंतर इतर काही नोकऱ्या, काही छोटे उद्योग – पण यश हाती आलं नाही. कुणी दुसरं असतं तर कदाचित हार मानली असती. पण अय्यंगार हार मानणाऱ्यांतले नव्हते.
एका दिवशी त्यांनी ब्रिटिशांची रेल्वे व्यवस्था जवळून पाहिली. रेल्वे फक्त ब्रिटिशांच्या सोयीसाठी होती, गावकऱ्यांना मात्र प्रवासाची मोठी अडचण. आणि तेव्हाच त्यांच्या मनात ठरलं – “गावकऱ्यांसाठी काहीतरी करायला हवं!”
मग त्यांनी बस सेवा सुरू करण्याचा विचार केला. पण मोठं स्वप्न आणि खिशात शून्य भांडवल. काय करावं? शेवटी वडिलांकडे मदत मागितली. वडिलांनी आधार दिला आणि त्यातून ५ शेवरले बस खरेदी करून त्यांनी १९११ मध्ये टी.व्ही. सुंदरम अय्यंगार अँड सन्स ची स्थापना केली. मदुराईच्या रस्त्यावरून जेव्हा त्या बस धावू लागल्या, तेव्हा लोकांच्या डोळ्यांत आनंदाचे पाणी तरळलं.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
ही सुरुवात होती… यशाचा प्रवास तर आता सुरू झाला होता.
पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात देशात पेट्रोलची टंचाई झाली. पण अय्यंगार यांच्यासाठी ती समस्या नव्हती – ती संधी होती. त्यांनी गॅस प्लांट सुरू केला. मग रबर रीट्रेडिंग कारखाना, मद्रास ऑटो सर्व्हिस, सुंदरम मोटर्स… एकामागोमाग एक पायऱ्या चढत ते पुढे गेले.
१९७० च्या दशकात TVS ने दुचाकी क्षेत्रात पाऊल टाकलं. १९७६ मध्ये मोपेड, तर १९७८ मध्ये मोटारसायकली बाजारात आल्या. स्वदेशी ब्रँड म्हणून TVS च्या बाइक्स लोकांच्या हृदयात घर करू लागल्या.
आठ मुलांचे वडील असलेले अय्यंगार ७८व्या वर्षी जगाचा निरोप घेतले. पण त्यांचं स्वप्न, त्यांची जिद्द, त्यांचा वारसा – पुढच्या पिढ्यांनी जिवंत ठेवला.
आज TVS ग्रुपमध्ये TVS मोटर कंपनी, TVS इलेक्ट्रॉनिक्स, TVS होल्डिंग्ज, टर्बो एनर्जी, सुंदरम टेक्सटाईल्स यांसारख्या अनेक कंपन्या आहेत. BMW च्या २०% मोटारसायकली आज भारतात TVS बनवते. आणि बाजारात TVS मोटर कंपनीचं मूल्य आहे तब्बल १.६६ लाख कोटी रुपये!
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
भारतात स्वदेशीचं स्वप्न पाहिलं, अपयश झेललं, पण हार मानली नाही… आणि अखेर भारताला दिलं एक असं नाव, ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटलाच पाहिजे ते म्हणजे – TVS