मुंबई
Ladki Bahin Yojana E-KYC Process :
महाराष्ट्र सरकारच्या महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि फक्त पात्र महिलांपर्यंतच लाभ पोहोचावा, यासाठी शासनाने आता सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया बंधनकारक केली आहे.

- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
महिला व बालविकास विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, पुढील दोन महिन्यांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. शासनाचे म्हणणे आहे की, ई-केवायसीमुळे गैरप्रकारांना आळा बसेल आणि खरोखर गरजू महिलांनाच योजना मिळेल, याची खात्री होईल.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
- ई-केवायसी प्रक्रिया कशी करायची?
- १. सर्व पात्र महिला लाभार्थींनी https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर लॉग-इन करावे.
- २. येथे आपले वैयक्तिक तपशील व आवश्यक कागदपत्रे पुन्हा अपलोड करावी लागतील.
- ३. या कागदपत्रांमध्ये –
- आधार कार्ड माहिती
- शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक
- उत्पन्नाचा दाखला/माहिती
- नाव व पत्ता यांचा समावेश असेल.
- ४. ही माहिती सबमिट केल्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
सध्या पोर्टल सुरू नाही
दरम्यान, संबंधित पोर्टलवर तांत्रिक कारणांमुळे प्रक्रिया अजून पूर्णपणे सुरू झालेली नाही. मात्र, शासनाने लवकरच ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लाभार्थींनी अधिकृत वेबसाइट वेळोवेळी तपासत राहावे आणि प्रक्रिया सुरू होताच ती तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
पारदर्शकतेवर भर
आधार कायद्यातील तरतुदीनुसार, कोणत्याही शासकीय योजनेसाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे. त्यानुसारच लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. शासनाच्या मते, या पावलामुळे पात्र नसलेल्यांना वगळणे शक्य होईल आणि फक्त गरजू महिलांनाच लाभ मिळेल.
या योजनेबाबतच्या पुढील अपडेट्स आणि पोर्टल सुरू होण्याची अचूक तारीख लवकरच शासनाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे.