अर्चना कुटे सीआयडीच्या ताब्यात; २० महिन्यांपासून होत्या फरार

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

बीड :

Amazon

Amazon App Player

Download Now

ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात तब्बल २० महिन्यांपासून फरार असलेल्या अर्चना कुटे यांना अखेर सीआयडीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पुण्यातून त्यांना अटक करण्यात आली असून पुढील चौकशीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात येत आहे.

ज्ञानराधा मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. बीडसह महाराष्ट्रातील सुमारे ५२ शाखांतून हजारो ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची रक्कम परत न मिळाल्याने ठेवीदारांनी आंदोलन छेडले होते. अखेर अध्यक्ष अर्चना कुटे, संचालक सुरेश कुटे व इतरांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले.

याप्रकरणी सुरेश कुटे, आशिष पाटोदकर आणि कुलकर्णी हे सध्या बीड जिल्हा कारागृहात आहेत. मात्र अर्चना कुटे गेल्या दोन वर्षांपासून फरार होत्या. या फरारीमुळे बीड पोलीस आणि तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

अर्चना कुटे यांनी ‘तिरुमला’ या नावाने अनेक ऑईल कंपन्या सुरू केल्याची माहितीही चौकशीत पुढे आली होती. द कुटे ग्रुपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप आहेत.

ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यामुळे हजारो ठेवीदारांची आर्थिक व मानसिक होरपळ झाली. काही ठेवीदारांनी आत्महत्येचाही मार्ग निवडला होता. त्यामुळे अर्चना कुटे यांच्या अटकेची ठेवीदारांकडून सातत्याने मागणी होत होती.

आज (१६ सप्टेंबर) अखेर छत्रपती संभाजीनगरच्या सीआयडी पथकाने अर्चना कुटे यांना पुण्यातून ताब्यात घेतले. या कारवाईनंतर ठेवीदारांमध्ये थोडा दिलासा निर्माण झाला असला तरी “आता तरी आमचे पैसे परत मिळणार का?” असा सवाल ठेवीदारांकडून केला जात आहे.

ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्याचा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, अर्चना कुटे यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now