महाराष्ट्रा मध्ये सध्या आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद उभा राहिला आहे. हैद्राबाद गॅझेटनुसार सरकारने बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी त्यांनी केली. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट केल्याशिवाय त्यांचा लढा थांबणार नसल्याचंही मुंडे यांनी स्पष्ट केलं.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
यावेळी मुंडेंनी केलेल्या एका विधानाने चर्चेला अधिक उधाण आलं. “बंजारा आणि वंजारी हे दोन्ही समाज एकच आहेत,” असं ते म्हणाले. त्यानंतर दोन्ही समाज वेगळे की सारखे, याबाबत राज्यभरात प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
बंजारा आणि वंजारी – एकच की वेगळे?
तज्ज्ञांच्या मते बंजारा आणि वंजारी हे नामसाधर्म्यामुळे सारखे वाटत असले तरी प्रत्यक्षात हे दोन वेगळे समाज आहेत.
भाषा व संस्कृतीत फरक : बंजारा समाज लाम्बडी ही भाषा बोलतो, तर वंजारी समाजाची बोली वेगळी आहे.
धार्मिक श्रद्धा : वंजारी समाज भगवान बाबा यांचे अनुयायी मानले जातात, तर बंजारा समाज संत सेवालाल महाराजांची भक्ती करतो.
जातीय वर्गवारी :
बंजारा समाज महाराष्ट्रात विमुक्त जमाती (VJNT) प्रवर्गात येतो.
वंजारी समाज भटक्या जमाती-ड (NT-D) मध्ये मोडतो.
सामाजिक व्यवहार : दोन्ही समाज राजस्थानातून स्थलांतरित झालेले असले तरी रोटी-बेटीचा व्यवहार परंपरेत दिसत नाही.
आडनावं व परंपरा : आडनावं, सण-उत्सव, मंदिरं या बाबतीत दोन्ही समाज वेगळे आहेत.
बंजारा समाज कोण?
बंजारा समाजाला गोर बंजारा किंवा लमाण म्हणूनही ओळखलं जातं. हा समाज परंपरेने तांड्याने फिरत आपला उदरनिर्वाह करीत असे. इतिहासकारांच्या मते बंजारा समाजाचा वारसा सिंधू संस्कृतीपर्यंत पोहोचतो.
लाम्बडी ही त्यांची मुख्य भाषा आहे.
काही राज्यांत बंजारा समाज अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात आहे, परंतु महाराष्ट्रात ते VJNT मध्ये येतात.
हैद्राबाद गॅझेटियरमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख आदिवासी असा करण्यात आला असून त्याच आधारे एसटी आरक्षणाची मागणी केली जात आहे
सध्या या समाजासाठी ७ टक्के आरक्षण देण्याची मागणी होते आहे.
वंजारी समाज कोण?
वंजारी समाज व्यापारी व लढाऊ म्हणून इतिहासात ओळखला जातो. राजस्थानातून दक्षिण भारतात स्थलांतरित झालेल्या क्षत्रिय जातींपैकी वंजारी ही एक
महाराष्ट्रात हा समाज NT-D प्रवर्गात मोडतो.
वंजारी समाज रेणुका माता आणि जमदग्नी ऋषींचे वंशज असल्याचं मानतो.
तसेच वंजारी समाज राजपूत कुळातील महाराणा प्रताप यांचे वंशज मानतो.
पुढचा राजकीय वाद?
धनंजय मुंडेंच्या विधानानंतर दोन्ही समाजांत अस्वस्थता वाढली आहे. वंजारी समाजाकडून ते बंजाऱ्यांशी वेगळेपणा टिकवण्याची मागणी होते आहे, तर बंजारा समाज एसटी आरक्षणासाठी ठामपणे आग्रही आहे. आगामी काळात या प्रश्नावर राजकीय वाद वाढण्याची चिन्हं दिसत आहेत.