नांदगाव-मालेगाव मार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. छत्रपती संभाजीनगरहून मालेगावकडे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वऱ्हाडाची प्रवासी मिनी बस नागा-साक्या धरणाजवळ पलटी झाल्याने तब्बल 35 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला आणि लहान बालकांचाही समावेश असून चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
अपघाताची घटना
मिळालेल्या माहितीनुसार, मिनी बस नागा-साक्या धरणाजवळील वळणावरून जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाने अचानक कट मारला. या अनपेक्षित परिस्थितीत बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि मिनी बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की क्षणभर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
स्थानिक नागरिकांची तत्पर धाव
अपघाताची बातमी समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेकांनी स्वतःच्या वाहनांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात हलवले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी मालेगाव व छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
काही वेळ वाहतूक विस्कळीत
अपघातानंतर काही काळ नांदगाव-मालेगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना विशेष प्रयत्न करावे लागले.
वैद्यकीय उपचार सुरू
किरकोळ जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. मात्र, गंभीर जखमींवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्तांची प्रकृती लक्षात घेता वैद्यकीय पथकाने सतत देखरेख ठेवली आहे.
पोलिसांचा तपास सुरू
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताची नोंद केली असून, नेमका अपघात कशामुळे झाला याचा पुढील तपास सुरू आहे.