दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या एसएससी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होत असून, विद्यार्थ्यांना निश्चित मुदतीत अर्ज दाखल करावा लागणार आहे.

- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसणार असल्याने शिक्षण क्षेत्राचे लक्ष या प्रक्रियेकडे लागले आहे. मंडळाने स्पष्ट केले आहे की, १५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नियमित शुल्क भरून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा अर्ज दाखल करता येणार आहेत. ही प्रक्रिया विद्यार्थ्यांनी थेट न करता त्यांच्या शाळांमार्फतच पूर्ण केली जाणार आहे.
अर्ज भरण्याची प्रक्रिया
सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ‘यूडायस प्लस’ (U-DISE Plus) पेनआयडी वरून शाळा प्रमुखांच्या माध्यमातून भरले जातील.
पुन्हा परीक्षा देणारे, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत अर्ज करणारे, तुरळक विषय घेणारे तसेच आयटीआय मधून ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्यांचे अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावर www.mahahsscboard.in उपलब्ध राहतील.
परीक्षा शुल्क आरटीजीएस/एनईएफटीद्वारे भरावे लागणार असून त्याची पावती व विद्यार्थ्यांची यादी निश्चित तारखेला मंडळाकडे जमा करावी लागेल.
शाळांनी घ्यायची काळजी
मंडळाने सर्व शाळांना अर्ज प्रक्रियेबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत :
अर्ज सुरू करण्यापूर्वी ‘स्कूल प्रोफाइल’मध्ये शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय आणि शिक्षकांची अचूक माहिती भरून सबमिट करणे आवश्यक आहे.
अर्ज सबमिट केल्यानंतर शाळेच्या लॉगिनवर ‘प्री-लिस्ट’ उपलब्ध होईल. ही यादी विद्यार्थ्यांना पडताळणीसाठी देऊन त्यांच्या स्वाक्षरी घेणे बंधनकारक आहे.
प्रत्येक पानावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी आणि शिक्का आवश्यक राहील.
नियमित विद्यार्थ्यांची माहिती यूडायस प्लसमध्ये उपलब्ध नसेल तर शाळांना ती भरून अर्ज दाखल करता येईल.
पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार व आयटीआय विद्यार्थी यांची माहिती यूडायस प्लसमध्ये उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे अर्ज जुन्या पद्धतीप्रमाणे ऑनलाइन भरले जातील.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा टप्पा
दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक मानली जाते. पुढील शिक्षणाच्या वाटचालीसाठी हीच पायरी निर्णायक ठरते. त्यामुळे अर्ज भरण्यापासून ते परीक्षेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांनी व शाळांनी काटेकोरपणे लक्ष देणे आवश्यक आहे, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दहावीचा फॉर्म भरण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू होत असून ६ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येणार आहेत. शाळांमार्फतच ही प्रक्रिया केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी व पालकांनी वेळेत लक्ष देऊन अर्ज पूर्ण करावा, अन्यथा उशिरामुळे होणाऱ्या अडचणींसाठी जबाबदार राहावे लागेल.