माजलगाव धरणातून 31,335 क्युसेक पाण्याचा विसर्ग , सिंधफणा व गोदावरी खोऱ्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

माजलगाव :
माजलगाव प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीपातळी वाढत असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने धरण प्रशासनाने आज (दि. 14 सप्टेंबर) दुपारी 12:30 वाजता काही दरवाजे अधिक उघडून विसर्ग वाढविला आहे.

Amazon

Amazon App Player

Download Now

धरण प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वक्रद्वार क्र. 11, 6, 16, 10, 12, 9, 13, 8, 14 आणि 15 हे दरवाजे प्रत्येकी 0.30 मीटरने अधिक उघडण्यात आले आहेत. यामुळे सध्या एकूण 10 वक्रद्वारे 0.80 मीटर उघडे असून, सिंधफणा नदीपात्रात तब्बल 31,335 क्युसेक (887.31 क्युमेक्स) इतका विसर्ग सुरू आहे.

धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकानुसार पुढील तासांमध्ये विसर्ग वाढविणे अथवा कमी करणे यासंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, सिंधफणा व गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी सतर्कता बाळगावी, सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

माजलगाव प्रकल्प पूरनियंत्रण कक्षाकडून नागरिकांना सतत इशारा व माहिती पुरविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now