मुसळधार पाऊस,ताशी 40 किमी वेगाने वारे, विजा कडाडणार; मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पावसाचा जोर पुन्हा वाढलेला आहे भारतीय हवामान विभागाने रविवारी (14 सप्टेंबर) दिवशी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस, वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास आणि विजांच्या कडकडाटाची देखील शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

Amazon

Amazon App Player

Download Now

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाने जोर धरला आहे. विशेषतः मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी सुरू असून सोबतच वाऱ्याची तीव्रताही वाढत आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, 13 सप्टेंबरपासूनच या भागात पावसाची तीव्रता वाढली असून ही स्थिती येत्या काही दिवसांपर्यंत कायम राहणार आहे.

भारतीय हवामान विभागाने या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे, त्यात हिंगोली, बीड, जालना, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 24 ते 48 तासांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अधिक राहण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, धरण क्षेत्रातही पावसाची नोंद झाल्याने अनेक प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग देखील पुन्हा सुरू करण्यात आला असून, नदीकाठच्या गावांना सतर्क तेचा इशारा प्रशासना कडून देण्यात आला आहे

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, मराठवाड्यात पावसाचे हे सत्र असेच आणखी काही दिवस काही दिवस राहणार आहे. छत्रपती संभाजीनगरसह आठही जिल्ह्यांत पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहील. त्यानंतर काही जिल्ह्यांत पावसाची तीव्रता किंचित कमी होण्याची शक्यता आहे, तरीही हवामान ढगाळ राहील.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शेती पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे उभ्या पिकांवर रोगराईचा धोका वाढू शकतो. नागरिकांनीही आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी, तसेच वीज कडकडाटाच्या वेळी झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे, असे आवाहन भारतीय हवामान खात्याने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now