पुणे :
महाराष्ट्रातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा संबंधात महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत येत्या रविवार, 23 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबरपासून सुरू होणार असून 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज सादर करता येतील, अशी माहिती परिषदेच्या प्रसिद्धी निवेदनातून देण्यात आली आहे.

- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
वेळापत्रक जाहीर
👉 अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची मुदत : 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2025
👉 प्रवेशपत्र डाऊनलोड : 10 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2025
👉 पेपर 1 (इ. 1 ली ते 5 वी) : 23 नोव्हेंबर, सकाळी 10.30 ते दुपारी 1.00
👉 पेपर 2 (इ. 6 वी ते 8 वी) : 23 नोव्हेंबर, दुपारी 2.30 ते सायं. 5.00
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
फक्त ऑनलाईन अर्ज मान्य
ही परीक्षा देण्यासाठी उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्जच करता येणार आहेत. ऑफलाईन अर्ज मान्य केले जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षा शुल्कही फक्त ऑनलाईन पद्धतीने – डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे भरता येईल. एकदा अर्ज सादर करून शुल्क भरल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही, याचीही नोंद घ्यावी.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत
अर्ज भरण्याच्या वेळी उमेदवारांनी खालील गोष्टी तयार ठेवाव्यात :
- इ. 10 वी व 12 वीची शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे
- व्यावसायिक अर्हतेची कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- दिव्यांगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- रंगीत पासपोर्ट साईझ फोटो (स्कॅन केलेला)
- स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
- स्वतःचे ओळखपत्र
- स्वयंघोषणा पत्र
परीक्षा दोन स्तरांमध्ये
MAHATET 2025 ही परीक्षा दोन स्तरांमध्ये घेण्यात येईल.
पेपर 1 : इयत्ता 1 ली ते 5 वी (प्राथमिक स्तर)
पेपर 2 : इयत्ता 6 वी ते 8 वी (उच्च प्राथमिक स्तर)
दोन्ही स्तरांसाठी उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज भरण्याची गरज नाही. फॉर्म भरताना दोन्ही पेपर देण्याचा पर्याय निवडता येईल, अशी सुविधा परिषदेने उपलब्ध करून दिली आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
अधिकृत संकेतस्थळावर माहिती
अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, निकाल व इतर सर्व माहिती https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परीक्षार्थ्यांनी वेळोवेळी या वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले आहे.
परीक्षा अनिवार्य का?
सरकारच्या 23 ऑगस्ट 2013 च्या निर्णयानुसार राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांमध्ये (अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित) शिक्षक पदावर नियुक्तीसाठी MAHATET परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
परीक्षेच्या वेळापत्रकात काही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने परीक्षार्थ्यांनी नियमितपणे अधिकृत वेबसाईट तपासावी, असे परिषदेने स्पष्ट केले आहे.