छत्रपती संभाजीनगर :
गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने थोडी विश्रांती घेतली होती आणि धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक हे मंदावली होती मात्र शुक्रवारी (12 सप्टेंबर) पासून पावसाचा जोर वाढत असल्याने धरणात पुन्हा पाण्याची चांगली भर पडत आहे. दुपारपासून 7073 क्युसेक वेगाने पाणी धरणात होत असल्यामुळे वाढत्या पाणीसाठ्याचा ताण हा कमी करण्यासाठी पाटबंधारे विभागाने 27 पैकी 12 दरवाजे हे अर्धा फूटाने उघडले आहेत. याद्वारे सध्या 6388 क्युसेक पाणी नियंत्रित पद्धतीने गोदावरी नदीच्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे

- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी धरणातील 18 दरवाजे बंद करण्यात आले होते. मात्र पावसाचा जोर पुन्हा वाढत असल्यामुळे आणि धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये देखील वाढ झाल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे गुरुवारी (11 सप्टेंबर) झालेल्या पावसामुळे धरणातील जलसाठ्यात मोठी भर पडली आहे. परिणामी सध्या जायकवाडी धरण तब्बल 99 टक्के क्षमतेने भरलं आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
यंदाच्या मान्सूनमध्ये ही तिसरी वेळ आहे की धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पहिल्यांदा 31 जुलै रोजी दरवाजे उघडण्यात आलेले होते, त्यानंतर 21 ऑगस्ट रोजी दुसऱ्यांदा पाणी सोडण्यात आले होते. या दोन्ही वेळच्या विसर्गातून मिळून 40 टीएमसी पाणी गोदावरीच्या पात्रात सोडण्यात आलं होतं. आता, 12 सप्टेंबर रोजी तिसऱ्यांदा पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
धरणातील पाणी सोडण्याचा निर्णय पूर्णपणे पावसाच्या पाण्याच्या आवकवर अवलंबून असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे पावसाचा जोर वाढल्यास विसर्गाचं प्रमाण वाढवलं जाईल, तर पाऊस कमी झाल्यास विसर्ग घटवला ही जाणार आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
मराठवाड्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने जायकवाडी धरणाचे महत्व प्रचंड आहे. त्यामुळे धरणातून नियंत्रित पद्धतीने होत असलेला विसर्ग हा परिसरातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरला आहे.